मुंबई : (India's First AI University) येत्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात भारताचे पहिले एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) विद्यापीठ (India's First AI University) स्थापन केले जाईल, त्याचबरोबर ४ लाख आयटी नोकऱ्या आणि ५०,६०० कोटींच्या गुंतवणुकीचे येत्या काळात लक्ष्य असेल, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.(India's First AI University)
विश्व हिंदू इकोनॉमिक फोरमच्या दोन दिवसीय (१९-२० डिसेंबर) वार्षिक परिषदेला ग्रॅण्ड हयात, सांताक्रूझ येथे सुरुवात झाली असून परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. ई-गव्हर्नन्सपासून आय-गव्हर्नन्स आणि पुढे एआय-आधारित प्रशासनाकडे राज्याचा प्रवास सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.(India's First AI University)
कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर विश्व हिंदू इकोनॉमिक फोरमचे उपाध्यक्ष संजय खेमाणी, हिंदू इकॉनॉमिक फोरमचे राष्ट्रीय संघटन सचिव टी. आर. शिवप्रसाद, पोलिकैब इंडिया लिमिटेडचे सह-संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक इंदर जयसिंघानी, टेक्नॉक्राफ्ट इंडस्ट्रीज भारतचे लिमिटेडचे सह-संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. शरद सराफ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे प्रवर्तक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जैन आदी मान्यवर उपस्थित होते.(India's First AI University)
उपस्थितांना संबोधत आशिष शेलार पुढे म्हणाले, एआय विद्यापीठ आणि एआय सिटीचे भूमिपूजन पुढील सहा महिन्यांत होणार असून, टास्क फोर्सच्या शिफारसी, जागेची ओळख आणि प्रारंभिक नियोजन यासह महत्त्वाची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. हे एआय विद्यापीठ उद्योग आणि जागतिक गरजांशी सुसंगत अशा कृत्रिम बुद्धिमत्तेतील कौशल्यनिर्मिती, संशोधन क्षमता आणि नवोन्मेषावर लक्ष केंद्रित करेल. त्याचबरोबर राज्याच्या आयटी व नवोन्मेष रोडमॅपनुसार आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ४ लाख कुशल रोजगारनिर्मिती आणि ५०,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे लक्ष्य असल्याचेही आशिष शेलार यांनी सांगितले.(India's First AI University)
हेही वाचा : Osman Hadi : 'उस्मान हादी'च्या मृत्यूनंतर बांगलादेशात उसळले हिंसक आंदोलन
प्रशासनातील सुधारणांवर बोलताना त्यांनी नमूद केले की, राज्याने यशस्वीपणे ई-गव्हर्नन्स अंमलात आणले असून, आय-गव्हर्नन्सकडे वाटचाल केली आहे आणि आता एआय गव्हर्नन्सकडे पुढे जात आहे. धोरणात्मक निर्णय आणि सार्वजनिक सेवा वितरणात कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकांना चांगले परिणाम मिळावेत यासाठी एआय-आधारित प्रणालींचा वाढता वापर केला जाणार आहे. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (जीसीसी) गुंतवणुकीपैकी ५० टक्के हिस्सा महाराष्ट्रात आणण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी स्वतंत्र जीसीसी धोरण मंजूर करण्यात आले असून, सुलभ मंजुरी प्रक्रिया, सानुकूल प्रोत्साहने आणि क्षेत्रनिहाय सहाय्य यांसह ‘रेड कार्पेट’ पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.(India's First AI University)
वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या दुसऱ्या दिवशी एमएसएमई, उत्पादन क्षेत्र, स्टार्टअप्स, महिला उद्योजक आणि तळागाळातील व्यवसाय मॉडेल्स यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. स्थानिक उद्योग बळकट करणे, वित्तपुरवठ्याची उपलब्धता सुधारणे आणि विविध प्रदेशांत विस्तारक्षम व शाश्वत आर्थिक व्यवस्था उभारणे यावर चर्चा झाली.(India's First AI University)
सायबर सुरक्षेबाबत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राने प्रगत तंत्रज्ञान आणि विशेष टास्क फोर्सच्या सहाय्याने मजबूत, सरकारी पाठबळ असलेली सायबर सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. टियर-१ आणि टियर-२ सायबर सुरक्षा केंद्रांसह केंद्रीय सायबर वॉर रूम विकसित करण्यात आली असून, यामुळे महत्त्वाच्या आर्थिक व वित्तीय प्रणालींचे संरक्षण प्रभावीपणे केले जात आहे.(India's First AI University)
महाराष्ट्राची गुंतवणूकदार-मैत्रीपूर्ण परिसंस्था भक्कम पायाभूत सुविधा, मेट्रो व विमानतळ जोडणी, डिजिटल सार्वजनिक सेवा आणि सिंगल-विंडो मंजुरी यांमुळे सक्षम असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये इनोव्हेशन सॅंडबॉक्स, आयटी पार्क्स आणि पूरक पायाभूत सुविधा विकसित केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.(India's First AI University)
हिंदू इकॉनॉमिक फोरमचे राष्ट्रीय संघटन सचिव टी. आर. शिव प्रसाद म्हणाले, “हिंदू इकोनॉमिक फोरम केवळ जागतिक पातळीवरील चर्चांपुरते मर्यादित नाही. मार्गदर्शन, भांडवलाची उपलब्धता आणि बाजारपेठेचे मार्गदर्शन देऊन स्थानिक व्यवसायांना सक्षम करत तळागाळात मजबूत आर्थिक व्यवस्था उभारणे हा आमचा केंद्रबिंदू आहे. गावांना राष्ट्रीय आणि जागतिक नेटवर्कशी जोडून आम्ही शाश्वत आणि आत्मनिर्भर आर्थिक परिसंस्था निर्माण करत आहोत.” (India's First AI University)