Shalinitai Patil : काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री शालीनीताई पाटील यांचं निधन, वयाच्या ९४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

20 Dec 2025 20:04:43
Shalinitai Patil
 
मुंबई : (Shalinitai Patil) दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांचे माहीम ,मुंबईमधील निवासस्थानी दुःखद निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही महिन्यापासून शालिनी ताई या आजारी होत्या.(Shalinitai Patil)
 
साताऱ्यातील कोरेगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून १९९९ ते २००९ या काळात त्या आमदार म्हणून देखील निवडून आल्या होत्या.(Shalinitai Patil)  अंतुलेंच्या मंत्रिमंडळात त्या महसूलमंत्री होत्या. मराठा आरक्षणासाठी त्यांनी पहिली हाक दिली होती.(Shalinitai Patil)
 
हेही वाचा : Nitish Kumar : मुस्लीम महिला एकवटल्या, नितिश कुमारांविरोधात देशभरातून तक्रारी दाखल करण्याची होतेय मागणी 
 
त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देखील केले होते.तसेच साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी शालिनीताईंना (Shalinitai Patil) मातेसमान दर्जा दिला होता.शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचा (Shalinitai Patil) उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण असा केला होता.(Shalinitai Patil)
 
Powered By Sangraha 9.0