Ambarnath EVM Machine : अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड! मतदानावेळी गोंधळ

20 Dec 2025 16:01:44
 
Ambarnath EVM Machine
 
मुंबई : (Ambarnath EVM Machine) अंबरनाथमध्ये मतदानाच्या दिवशी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस ओळखपत्रे आढळून आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अंबरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक २९ मध्ये हा प्रकार घडला आहे. (Ambarnath EVM Machine)
 
हेही वाचा :  Municipal Corporation Election : महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी - राज्य निवडणूक आयुक्त
 
मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन (Ambarnath EVM Machine) घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांच्या आयडी कार्डवर फोटो, नाव, सही तसेच अधिकृत शिक्का नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच या प्रभागातील सर्वच उमेदवारांनी तात्काळ आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला.
 
या प्रकारामुळे मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. (Ambarnath EVM Machine)
 
 
Powered By Sangraha 9.0