मुंबई : (Thane-Borivali Double Tunnel Project) भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प (Thane-Borivali Double Tunnel Project) अत्यंत वेगाने आकार घेत आहे. भारतातील सर्वात मोठा बोगद्याचे काम १३.३४ मीटर सिंगल शील्ड टीबीएमच्या सहाय्याने जुळ्या बोगद्याचे खोदकाम करण्यात येत आहे. दि.२९ नोव्हेंबर,२०२५ रोजी ठाणे येथील बोगद्याचे काम पूर्ण केले आहे.(Thane-Borivali Double Tunnel Project)
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे संवेदनशील क्षेत्र असल्याने, पर्यावरणपूरक पद्धतीने टनेल बोरिंग मशीन वापरून हे काम करण्यात येत आहे. या बोगद्यामुळे २ तासांचे अंतर १० ते १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली दुहेरी बोगद्यांचे बांधकाम (Thane-Borivali Double Tunnel Project) तसेच बोरिवलीकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग व ठाणेकडील घोडबंदर रोड यांना जोडणाऱ्या पोहोच रस्त्यांचा समावेश आहे. हा प्रकल्प दोन समांतर बोगद्याच्या आहे, यात प्रत्येक बोगद्यात ३ लेन आहेत, त्यापैकी एक आपत्कालीन लेन असेल. तसेच दर ३०० मीटरवर क्रॉस-पॅसेजेस असतील. २०२८पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.(Thane-Borivali Double Tunnel Project)
हेही वाचा : Eastern Freeway : दक्षिण मुंबई–ठाणे प्रवास फक्त २५ मिनिटांत
दरम्यान मेघा इंजिअनिअरींग इन्फ्रास्ट्रक्चर (मेल)ने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे–बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पाद्वारे इतिहास रचला जात आहे. भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा आणि सर्वांत लांब बोगदा असणारा हा प्रकल्प ठाणे–बोरिवलीदरम्यानचा १ ते २ तासांचा प्रवास केवळ 15 मिनिटांवर आणणार आहे, तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरणाचे संरक्षणही करणार आहे. १३.३४ मीटर व्यासाचे टीबीएम, जे भारतात यापूर्वी कोणत्याही महानगरात वापरण्यात आलेल्या टनेल बोअरिंग मशीनपेक्षा सर्वांत मोठे टनेल बोरिंग मशीन आहे. त्याद्वारे तीन-लेनचे दोन स्वतंत्र बोगदे खोदले जात आहेत. दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी, मेलने ठाणे बाजूच्या पोर्टलचे उत्खनन पूर्ण केले आणि विशाल कटर हेड सुरक्षितपणे खाली उतरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. ज्यामुळे आता मुंबई एका नव्या कनेक्टिव्हिटी युगाच्या अधिक जवळ पोहोचली आहे.(Thane-Borivali Double Tunnel Project)
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
एकूण लांबी: 11.84 किमी
बोगद्याची लांबी: 10.25 किमी
जोड रस्ते: 1.59 किमी
लांबीचे विभागणी:
बोरिवली बाजूने: 5.75 किमी
ठाणे बाजूने: 6.09 किमी