मुंबई : (National Highway Authority of India) राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षितता वाढविण्यासाठी आणि प्रवाशांना अखंड व सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी इंडियाने (National Highway Authority of India) रिलायन्स जिओसोबत सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवर दूरसंचार-आधारित सुरक्षा अलर्ट प्रणाली लागू करण्यात येणार आहे. जिओच्या विद्यमान ४जी आणि ५जीनेटवर्कचा वापर करून प्रवाशांना अपघात प्रवण ठिकाणे, जनावरे रस्ता ओलांडणारे भाग, धुके ग्रस्त क्षेत्रे, तसेच तात्पुरते वळण मार्ग अशा जोखमीच्या ठिकाणांच्या काही अंतर आधीच त्यांच्या मोबाईलवर सूचना मिळतील.(National Highway Authority of India)
या उपक्रमाचा उद्देश महामार्ग वापरकर्त्यांना योग्य वेळी माहिती उपलब्ध करून देऊन त्यांना वेग नियंत्रित करणे, दक्षता वाढविणे आणि सुरक्षित ड्रायव्हिंग पद्धती अवलंबणे यासाठी सहाय्य करणे हा आहे. एसएमएस, व्हॉट्सअॅप संदेश आणि हाय-प्रायोरिटी कॉलच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांना हे अलर्ट पाठवले जातील. ही प्रणाली टप्प्याटप्प्याने नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (National Highway Authority of India) डिजिटल प्लॅटफॉर्म्सशी ‘राजमार्ग यात्रा’ मोबाईल अॅप आणि आपत्कालीन हेल्पलाइन '१०३३' जोडली जाईल.(National Highway Authority of India)
ही स्वयंचलित प्रणाली जिओ नेटवर्कवरील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी महामार्ग परिसरात कार्यरत असेल. संभाव्य जोखमीच्या झोनमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच प्रवाशांना पूर्वसूचना मिळेल. विद्यमान टेलिकॉम टॉवर्सचा उपयोग असल्यामुळे अतिरिक्त रोडसाईड हार्डवेअरची गरज भासणार नाही आणि प्रणाली अतिशय जलद तैनात करता येईल. देशातील ५० कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या जिओच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा या भागीदारीत उपयोग होणार आहे.(National Highway Authority of India)
हेही वाचा : Rohingya Refugees : घुसखोरांसाठी लाल गालिचा अंथरू शकत नाही
सुरुवातील प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली लागू करत काही प्रादेशिक कार्यालयांमध्ये जोखमीचे झोन ओळखणे आणि अलर्ट पाठविण्याचे निकष निश्चित केले जातील. या उपक्रमात सर्व लागू नियामक तरतुदी आणि डेटा-सुरक्षा नियमांचे पूर्ण पालन केले जाणार आहे. एनएचएआय इतर दूरसंचार सेवा प्रदात्यांसोबतही अशा प्रकारची व्यवस्था विकसित करण्याचा विचार करत आहे. मजबूत डिजिटल अधोसंरचना आणि रिअल-टाईम संप्रेषण साधनांच्या संयोगाने हा उपक्रम प्रवाशांची जागरूकता वाढविण्यास आणि टाळता येण्यासारख्या अपघातांमध्ये घट करण्यास महत्त्वपूर्ण मदत करेल.(National Highway Authority of India)
“या उपक्रमामुळे प्रवाशांना समयोचित आणि विश्वासार्ह माहिती मिळेल. ज्यामुळे ते वेळेवर निर्णय घेऊ शकतील आणि अधिक सुरक्षित ड्रायव्हिंग पद्धती अवलंबू शकतील. महामार्ग सुरक्षिततेच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी हा उपक्रम एक नवा मापदंड ठरेल असा मला विश्वास आहे.”(National Highway Authority of India)
-संतोष कुमार यादव, अध्यक्ष, एनएचएआय
“या उपक्रमाद्वारे जिओच्या विस्तृत दूरसंचार नेटवर्कचा वापर करून लाखो प्रवाशांना वेळेवर सुरक्षा सूचना देता येतील. ज्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रवास अधिक सुरक्षित आणि माहितीपूर्ण बनेल.”(National Highway Authority of India)
- ज्योतिंद्र ठाकूर, अध्यक्ष, रिलायन्स जिओ