मुंबई : (Eastern Freeway) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्रीवे) (Eastern Freeway) विस्तारीकरण प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात केली असून छेडानगर–घाटकोपर–आनंदनगर–ठाणे या १३.९० किमी लांबीच्या उन्नत रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर दक्षिण मुंबई ते ठाणे हे अंतर केवळ २५ मिनिटांत पार करता येईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.(Eastern Freeway)
पूर्व मुक्त मार्गाने २०१३ पासून पी. डी’मेलो रोड ते चेंबूर हा प्रवास वेगवान झाला असला तरी चेंबूरनंतर ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत होता. ही समस्या ओळखून एमएमआरडीएने ईस्टर्न फ्री-वेचा (Eastern Freeway) विस्तार करण्याची दिशा घेतली. यामुळे दक्षिण मुंबई, चेंबूर, घाटकोपर आणि ठाणे यांच्यातील संपर्क अधिक सुकर होणार आहे.(Eastern Freeway)
विस्तारीकरणाच्या आराखड्यानुसार सहा मार्गिकांचा उन्नत मार्ग तयार करण्यात येणार असून यासाठी रमाबाईनगरमधील बाधित झोपड्यांचे स्थलांतर पूर्ण केले आहे. त्यानंतर अखेर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.(Eastern Freeway)
प्राधिकरणाने या प्रकल्पाला गती देण्याचे संकेत दिले असून ठरलेल्या कालावधीत उन्नत रस्ता पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मार्ग पूर्ण क्षमतेने वापरात आल्यावर घाटकोपर-ठाणे दरम्यानचा प्रवास अतिवेगवान होणार आहेच; शिवाय दक्षिण मुंबई–ठाणे हे अंतरही अवघ्या २५ मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या (Eastern Freeway) कामाला सुमारे चार वर्षे लागण्याचा अंदाज आहे. उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पूर्व उपनगरांपासून ठाण्यापर्यंतची कनेक्टिव्हिटी अधिक जलद, सुकर आणि नियोजित होणार आहे.(Eastern Freeway)
हेही वाचा : National Highway Authority of India : राष्ट्रीय महामार्गांवर दूरसंचार आधारित सुरक्षा अलर्ट
प्रकल्पाचे वैशिष्ट्य
- 2.5 मी. व्यासाचे मोनोपाइल्स, मजबूत पियर्स, ४० मीटर स्पॅन्स आणि २५ मीटर सिंगल-सेगमेंट सुपर स्ट्रक्चर
- एमएमआरमध्ये पहिल्यांदाच सिंगल-पाइल, सिंगल-पियर तंत्रज्ञानाचा वापर
- मुलुंड चेक नाका, ऐरोली जंक्शन आणि विक्रोळी जंक्शन येथे अप-डाउन रॅम्प
- नवघर फ्लायओव्हर जवळ 3+3 लेनचे उन्नत टोल प्लाझा
- अखंड, सुरक्षित आणि उच्च-वेगाने प्रवासासाठी अत्याधुनिक रचना
सध्याची कामांची प्रगती
• प्राथमिक सर्व्हेक्षण पूर्ण
• टेस्ट पाइल्सचे काम पूर्ण
• भू-तांत्रिक तपासणी मोठ्या प्रमाणात पूर्ण
• युटिलिटी ओळख जवळपास पूर्ण
• वर्किंग पाइल्स आणि पियर कास्टिंग सुरू