मुंबई : (Kairi Film) राष्ट्रीय पुरस्कार विजेते ख्यातनाम दिग्दर्शक शंतनू रोडे यांचा कैरी (Kairi Film) हा चित्रपट दि. १२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ३० नोव्हेंबरला या चित्रपटाचा (Kairi Film) ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुबोध भावे, सायली संजीव, शशांक केतकर, सिद्धार्थ जाधव, अरुण नलावडे, सुलभा आर्या अशी तगडी स्टारकास्ट एकत्र येणं हीच या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे.(Kairi Film)
हेही वाचा : Geeta Press : गीता प्रेसचा होणार विस्तार! योगी सरकारद्वारा मिळाली १० एकर जमीन
स्वरा मोकाशी लिखित, ९१ फिल्म स्टुडिओज आणि अमेय विनोद खोपकर इंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेला ‘कैरी’ हा चित्रपट (Kairi Film) निषाद गोलांबरे व मनोहर गोलांबरे यांच्या संगीताने अधिकच समृद्ध झाला आहे. “नारळी पोफळीच्या बागा” आणि “ए चेडवा” ही दोन गाणी सध्या प्रचंड व्हायरल झाली असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्या आधीच्या "गोष्ट एका पैठणीची" ह्या चित्रपटाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते आणि आता ‘कैरी’(Kairi Film) च्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी चित्रपटक्षेत्रात त्यांचं दिमाखदार कमबॅक होणार आहे, यात शंका नाही.“१२ डिसेंबरला कुटुंबासह, मित्रमंडळींसह जवळच्या सिनेमा गृहात ‘कैरी’ नक्की पाहा आणि मराठी चित्रपटाप्रती आपलं प्रेम दाखवा", असं आवाहन चित्रपटातील प्रत्येक कलाकार करत आहेत.(Kairi Film)