PMO Renamed: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदललं; 'या' नव्या नावानं ओळखलं जाणार

02 Dec 2025 20:08:06

PMO

मुंबई : (PMO Renamed Seva Teerth)
केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता पंतप्रधान कार्यालयाला ‘सेवा तीर्थ’ असे नवे नाव देण्यात येणार आहे. याचबरोबर देशभरातील राजभवनांना 'लोक भवन' असे संबोधले जाईल. तसेच, केंद्रीय सचिवालयाचे नाव 'कर्तव्य भवन' असेल.

पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, "आम्ही सत्तेकडून सेवेकडे वाटचाल करत आहोत. हा बदल प्रशासकीय नसून सांस्कृतिक आहे. सार्वजनिक संस्थांमध्ये मोठे बदल होत आहेत." सरकारचे म्हणणे आहे की, हे नवे नाव ठेवण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे प्रशासनाबद्दलचा दृष्टिकोन बदलणे. सत्ता आणि अधिकार या प्रतिमेपेक्षा सेवा, कर्तव्य आणि जबाबदारी यांना महत्त्व देणारी नवी ओळख तयार करणे हा हेतू आहे.

पंतप्रधान कार्यालय लवकरच साउथ ब्लॉकमधून बाहेर पडून नव्या ‘सेवा तीर्थ’ संकुलात स्थलांतरित होणार आहे. हे नवे संकुल सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा भाग आहे. अनेक वर्षांनंतर PMO मध्ये असा मोठा बदल घडत आहे. सरकारला अपेक्षा आहे की या नावांमुळे प्रशासनात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि सेवा करण्याची नवी भावना वाढीस लागेल.

Powered By Sangraha 9.0