Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project : ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प, पहिले टीबीएम आज भूगर्भात दाखल होणार

02 Dec 2025 20:00:22
Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project
 
मुंबई : (Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project) मुंबई इन मिनिट्स या मुख्यमनातरी देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिजनला गती देणाऱ्या 'ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पा'तील (Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project) भुयारीकरणाच्या कामाला आज बुधवार, दि. ३ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. (Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project)
 
मानखुर्द ते चेंबूर जंक्शन आणि पी'डिमेलो रोडवरील ऑरेंज गेट यांना जोडणाऱ्या ईस्टर्न फ्रीवेमुळे दक्षिण मुंबईच्या वाहतुकीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. ऑरेंज गेट टनलद्वारे दोन भूमिगत बोगद्यांचे काम ऑरेंज द्वार ते मरीन ड्राईव्ह पर्यत करण्याचे प्रस्तावित आहे. (Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या महत्वाकांक्षी प्रकल्पातील टीबीएम लॉन्चिंगचा महत्त्वाचा टप्पा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे. ऑरेंज गेट याठिकाणी हा सोहळा संपन्न होईल. यावेळी ऑरेंज गेट येथील लाॅन्चिंग शाफ्ट येथून पहिले टनेल बोअरिंग यंत्र (टीबीएम) भूगर्भात सोडण्यात येणार आहे. या टीबीएमच्या माध्यमातून ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह (Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project) दरम्यान भुयारीकरण केले जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबाजवणी करण्यात येत आहे.
 
हेही वाचा : Sanchar Saathi : सायबर गुन्ह्यांवर सरकारची मोठी कारवाई,
 
मानखुर्द ते चेंबूर जंक्शन आणि पी'डिमेलो रोडवरील ऑरेंज गेट यांना जोडणाऱ्या ईस्टर्न फ्रीवेमुळे दक्षिण मुंबईच्या वाहतुकीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. ऑरेंज गेट टनलद्वारे दोन भूमिगत बोगद्यांचे काम ऑरेंज द्वार ते मरीन ड्राईव्ह पर्यत करण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रकल्प मुंबईतील अतिशय गर्दीच्या व शहरी भागाखालून पूर्व मुक्तमार्ग ते सागरी किनारा मार्ग याद्वारे पूर्व-पश्चिम किनारपट्टीची दक्षिण मुंबईशी अतिरीक्त सिग्नल विरहीत जोडणी असलेला व वेगवान सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करुन देणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे पूर्व मुक्त मार्गापासून तांत्रिक दृष्टया आव्हानात्मक प्रकल्प असून या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ १५-२० मिनिटांनी कमी होण्यास मदत होईल व इंधनाची बचत तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल. (Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project)
 
वाहतूक कोंडी दूर करून चेंबूर -मरीन ड्राईव्ह असा थेट प्रवास अतिवेगवान करण्यासाठी एमएमआरडीएने ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह दरम्यान दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. ९.२ किमी लांबीच्या या दुहेरी बोगद्यासाठी ९१५८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा बोगदा मुंबई सागरी किनारा मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे दुहेरी बोगद्यावरून येणाऱ्या वाहनांना पुढे पश्चिम उपनगरांकडे जाणेही सोपे होईल. या बोगद्याच्या कामाला एमएमआरडीएकडून सुरुवात करण्यात आली आहे. दोन टीबीएम यंत्राद्वारे भुयारीकरण करण्यात येणार आहे. (Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project)
 
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:
 
-९.२ किमी लांबीचा भूमिगत भुयारी मार्ग
 
- ऑरेंज गेट (ईस्टर्न फ्रीवे) ते मरीन ड्राइव्ह कोस्टल रोडला जोडला जाईल.
 
- ६.५२ किमी दुहेरी-बोगदा प्रणाली विशेष आपत्कालीन लेनसह, ज्यामुळे अजून सुरक्षा वाढेल.
 
- पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी मजबूत करणे तसेच दक्षिण मुंबईसाठी रिंग रूट तयार करणे.
 
 
Powered By Sangraha 9.0