मुंबई : (Clean Godavari Bond) कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत ऐतिहासिक वारशाचेही जतन करण्यात येईल. दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांनी दिलेला उत्स्फूर्त सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.(Clean Godavari Bond)
नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक महापालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड'(Clean Godavari Bond) समारंभपूर्वक सूचीबद्ध करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के.एच. गोविंदराज, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान, 'मित्रा' चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री उपस्थित होते.(Clean Godavari Bond)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “२०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विकास भी और विरासत भी' हा मंत्र दिला आहे. २०२७ ला होणारा सिंहस्थ कुंभमेळा या मंत्राचे प्रतीक आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिक, त्र्यंबकेश्वर परिसरात विकासाची गतिविधी करणार आहोत. महाराष्ट्र शासन अधिक गतीने विकासकामे करणार आहे, ज्यात पायाभूत सुविधेच्या अंतर्गत 'क्लीन गोदावरी' (Clean Godavari Bond) कार्यक्रम हाती घेतला आहे, ज्याने गोदावरी नदीत फक्त प्रकिया केलेलेच पाणी वाहत राहील. नाशिक परिसरात कुंभमेळ्यासाठी विविध विकासकामे होत आहेत. राज्य शासनाने नगरविकास विभागामार्फत कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक असलेली अनेक पायाभूत कामे हाती घेतली आहेत. कुंभमेळ्याचे पावित्र्य कायम राखत विकास पुढे नेला जाईल. यासाठी अनेक योजना तयार केल्या असून त्या कार्यान्वित करण्यात येत आहेत.”(Clean Godavari Bond)
हेही वाचा : Lok Bhavan : महाराष्ट्रातील 'राजभवन' आता ‘लोकभवन’
“यापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनीही खुल्या वित्तीय बाजारातून बॉण्डद्वारे निधी उभारला आहे. आता नाशिक महानगरपालिका देखील म्यूनिसिपल बाँड मार्केट हाताळणार याचा आनंद आहे. तसेच ‘एनएसई’ प्रक्रियेमुळे २६ कोटी रुपये प्रोत्साहन निधी मिळणार असून याद्वारे महानगरपालिकेवरील व्याजभार शून्य टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. नाशिक महानगरपालिकेच्या ‘क्लीन गोदावरी बॉण्ड'ला गुंतवणूकदारांकडून सबस्क्रिप्शनसाठी मिळालेला चौपट प्रतिसाद ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आर्थिक सक्षमता, रेटिंग आणि पारदर्शक प्रक्रियेची पावती आहे. राज्यातील १५ महानगरपालिका अशा क्षमतेच्या असून नियमन प्रक्रियेतून विशिष्ट पात्रता आणि नियामक मान्यता पूर्ण करून या महानगरपालिकाही विकासासाठी निधी उभारू शकतात,” असेही ते म्हणाले.(Clean Godavari Bond)
ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करणार
“ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांच्या क्षमतेस चालना देण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात निधी उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात महापारेषण त्यानंतर महावितरण आणि महानिर्मिती या देशातील मोठ्या वीज कंपन्या सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. या प्रक्रियेसाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अनुभवाची मोठी मदत ठरेल,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.