Illegal Church Construction : आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीर चर्च उभारल्याने स्थानिकांचा संताप

    02-Dec-2025   
Total Views |
Illegal Church Construction
 
मुंबई : (Illegal Church Construction) गुजरातच्या सुरत मध्ये आदिवासींच्या जमिनीवर अवैधरीत्या (Illegal Church Construction) कब्जा करून चर्च बांधल्याचा प्रकार समोर आला आहे. उमरपाडा तालुक्यातील वहार गावात स्थानिकांनी या चर्चच्या बांधकामाला तीव्र विरोध दर्शवला. स्थानिकांचा आरोप आहे की हे बांधकाम करण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, या माध्यमातून परिसरात धर्मांतराच्या गतिविधींना प्रोत्साहन दिले जात आहे. (Illegal Church Construction)
 
मिळालेल्या वृत्तानुसार, आदिवासी समाजातील एका सदस्याने सांगितले, “आदिवासी समाज प्राचीन काळापासून नागदेव, गोवालदेव, वाघदेव आणि इतर देवतांची पूजा करत आला आहे. या रूढी-परंपरा अनादिकालापासून चालत आलेल्या आहेत. पण आजकाल आदिवासी भागांत मोठमोठे चर्च उभे केले जात आहेत आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्या जात आहेत. आमच्या भोळ्या-भाबड्या आदिवासी बांधवांचे प्रलोभन व लालच देऊन धर्मांतर केले जात आहे आणि हा कट आमच्या आदिवासी संस्कृतीचा नाश करण्यासाठी रचला आहे.” (Illegal Church Construction)
 
हेही वाचा :Thane-Borivali Double Tunnel Project : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाला गती   
 
स्थानिकांनी या अवैध बांधकामात (Illegal Church Construction) सामील असलेल्या ख्रिस्ती संस्थेच्या पादरीविरोधात कारवाईची मागणी केली असून याबाबत निवेदनही सादर केले आहे. (Illegal Church Construction)
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक