Sanchar Saathi : सायबर गुन्ह्यांवर सरकारची मोठी कारवाई! ‘संचार साथी’ अ‍ॅप सर्व स्मार्टफोन्समध्ये अनिवार्य

02 Dec 2025 19:39:00
Sanchar Saathi
 
मुंबई : (Sanchar Saathi) सायबर गुन्हेगारीपासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने सोमवारी 1 डिसेंबर रोजी स्मार्टफोन उत्पादकांना मार्च २०२६ पासून विक्रीस येणाऱ्या सर्व नवीन स्मार्टफोन्समध्ये 'संचार साथी' हे अ‍ॅप आधीच म्हणजेच प्री-इन्स्टॉल करण्याचे निर्देश दिले आहेत.(Sanchar Saathi)
 
परंतु, 'संचार साथी' अ‍ॅप हे नक्की आहे तरी काय?
 
तर 'संचार साथी' अ‍ॅप (Sanchar Saathi) एक सायबर सुरक्षेचं नवं साधन आहे. हे अ‍ॅप १७ जानेवारी २०२५ रोजी मोबाईल अ‍ॅप म्हणून लाँच करण्यात आलं. हे अ‍ॅप अँड्राइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.ऑगस्ट २०२५ पर्यंत हे अ‍ॅप५० लाखांहून जास्त वेळा डाउनलोड केलं गेलं आहे. साधारण ३७ लाखांहून अधिक चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाइल यशस्वीपणे ब्लॉक करण्यात आल्याचा दावा या ॲपमुळे (Sanchar Saathi) करण्यात आला आहे. याशिवाय या अ‍ॅपच्या माध्यमातून २२ लाख ७६ हजारांहून अधिक उपकरणांचा यशस्वीपणे शोध घेण्यात आला आहे. 'संचार साथी' (Sanchar Saathi) हे टेलिफोन रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या डीएनडी (डू नॉट डिस्टर्ब) अ‍ॅपसारखंच आहे, ज्याचा उपयोग अनावश्यक जाहिरातीचे स्पॅम मेसेज थांबवण्यासाठी केला जातो.(Sanchar Saathi)
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : दक्षिणगंगा गोदावरीच्या स्वच्छतेसाठी एनएमसी क्लिन गोदावरी बॉण्ड्सद्वारे निधी उभारणी  
 
‘संचार साथी’ (Sanchar Saathi) ॲप हे तीन प्रमुख सेवा देणार आहे, यात हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन ब्लॉक करणे, तुमच्या नावावर किती मोबाईल कनेक्शन आहेत, हे तपासणे, व ‘चक्षू’ नावाच्या पर्यायाद्वारे फसवणुकीची तक्रार देणे, या सेवांचा समावेश असेल. हे थेट सरकारच्या टेलिकॉम सुरक्षा प्रणालीशी जोडलं गेलेलं आहे. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा देशातील प्रत्येक मोबाइल फोनचा आयएमइआय नंबर नोंदवणारा केंद्रीय डेटाबेस आहे. त्यामुळे सरकारचा असा दावा आहे की, 'संचार साथी' अ‍ॅप हे फोन सुरक्षित ठेवण्यासाठी, ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी आणि डिजिटल फसवणूक टाळण्यासाठीचं सोपं आणि उपयोगी साधन आहे.(Sanchar Saathi)
 
 
 
Powered By Sangraha 9.0