Dandakrama Vikramaditya : 'दण्डक्रम विक्रमादित्य' देवव्रत रेखे; अहिल्यानगरच्या वेदमूर्तीने रचला इतिहास

02 Dec 2025 13:56:27

Dandakrama Vikramaditya
 


मुंबई : (Dandakrama Vikramaditya) काशीमध्ये मागील ५० दिवसांपासून सुरू असलेल्या दण्डक्रम वेद पारायणाचा (Dandakrama Vikramaditya) समारोप नुकताच झाला. राज्यातील अहिल्यानगरचे वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे (वय वर्ष १९) यांनी अत्यंत कठीण अशा स्वरुपाचे दंडक्रम वेद पारायण निरंतर व न चूकता पूर्ण केले असून 'दण्डक्रम विक्रमादित्य' (Dandakrama Vikramaditya) ही उपाधी त्यांनी प्राप्त केली आहे. देवव्रत यांनी या दंडक्रम पारायणात २५ लाखांहून अधिक पदांचे ५० दिवस निरंतर ग्रंथ न पाहता त्रुटिरहित पठण करून विश्वभरात वेद-परंपरेचा अभिमान उंचावला. शृंगेरी पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू भारती तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच एक भव्य कार्यक्रम संपन्न झाला.(Dandakrama Vikramaditya)
 

मिळालेल्या माहितीनुसार, देवव्रत यांनी २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयात पारायण केले. दररोज सकाळी 8 ते दुपारी १२ या वेळेत शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिनी शाखेतील सुमारे २००० मंत्रांचे दंडक्रमाने ते पठण करत होते. काशीमध्ये असे दंडक्रम पारायण २०० वर्षांनंतर प्रथमच झाले. याआधी सुमारे दोन शतकांपूर्वी नाशिकमध्ये वेदमूर्ती नारायण शास्त्री यांनी असे पारायण केले होते.(Dandakrama Vikramaditya)
 
Dandakrama Vikramaditya 
 

अन्नपूर्णा मंदिराचे महंत शंकरपुरी महाराज, महेश चैतन्य ब्रह्मचारी (हरिद्वार), आचार्य राजाराम शुक्ल आणि आचार्य हृदयरंजन शर्मा यांनी याप्रसंगी देवव्रत यांचा सत्कार केला. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांच्या सन्मानार्थ त्यांना सोन्याचे कडं आणि ₹१,०१,११६ प्रदान करण्यात आले. यावेळी काशीच्या विद्वानांकडून आणि विविध संस्थांकडूनही देवव्रत यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर देवव्रत यांचे वडील व गुरू महेश चंद्रकांत रेखे, श्रोता देवेंद्र रामचंद्र गढीकर आणि पारायण संयोजक नीलेश केदार जोशी यांचाही सत्कार करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवव्रत यांचे मनापासून अभिनंदन केले असून वैदिक परंपरेचे तेज असेच उजळवत राहो, याबाबत मनस्वी शुभेच्छा दिल्या आहेत.(Dandakrama Vikramaditya)
 

हेही वाचा :  नगरनियोजनात प्रत्येक घटकाचा विचार व्हायला हवा


वैदिक मौखिक परंपरेनुसार ‘दण्डक्रम’ ही सर्वाधिक कठिण, सुसंगठित आणि विलक्षण पद्धत आहे. विशेष म्हणजे हे अत्यंत कठीण ‘दण्डक्रम’ (Dandakrama Vikramaditya) पारायण जगाच्या पाठीवर आणि इतिहासात फक्त दुसऱ्यांदा झाले आहे. ते ही वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी आणि महाराष्ट्राच्या सुपुत्राकडून घडले याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. या अलौकिक व अद्भुत कार्यापुढे आम्ही केवळ नतमस्तक आहोत!(Dandakrama Vikramaditya)
- आचार्य तुषार भोसले, प्रदेशाध्यक्ष, भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी
 
 

Powered By Sangraha 9.0