BJP Kopri Karyakarta Melava : कोपरीत भाजपाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात

19 Dec 2025 13:50:52
BJP Kopri Karyakarta Melava
 
ठाणे : (BJP Kopri Karyakarta Melava) कोपरी येथे प्रभाग क्रमांक १९ येथे ‘माझा कार्यकर्ता - कुटुंब मेळावा’ (BJP Kopri Karyakarta Melava) भाजपचे विजय त्रिपाठी यांनी आयोजित केला होता. संघटनात्मक बांधिलकी, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षाशी असलेली निष्ठा यांचे प्रभावी दर्शन घडवणारा हा मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी ठाणे शहर आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, कोपरी मंडल अध्यक्ष कृष्णा भुजबळ, निलेश लोहाटे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थित होते.(BJP Kopri Karyakarta Melava)
 
हेही वाचा : Padma Shri Nivedita Bhide : पद्मश्री निवेदिता भिडे यांचा ठाणेकरांशी मुक्तसंवाद
 
कार्यकर्त्यांच्या समर्पणामुळेच संघटना अधिक मजबूत होत असल्याचा विश्वास यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी (BJP Kopri Karyakarta Melava) हा एक मोठा परिवार आहे, कोपरी मंडळातील कार्यकर्त्यांनी हा मेळावा आयोजित केला होता, यामुळे आमचे काम आहे कि, कार्यकत्यांच्या भावना आम्ही एकूण आणि समजून घेतल्या असल्याचे आमदार संजय केळकर यांनी संगितले.(BJP Kopri Karyakarta Melava)
 
तसेच प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी या भारतीय जनता पक्षाच्या मूलभूत तत्वांना आधार मानत, विजय आणि जनहित या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.(BJP Kopri Karyakarta Melava)
 
Powered By Sangraha 9.0