मुंबई : (Thackeray Alliance) आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी पुन्हा एकदा भेट घेतली. या भेटीमुळे ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युती जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. (Thackeray Alliance)
हेही वाचा : Raosaheb Danve VS Uddhav Thackeray : ‘ही शेवटची निवडणूक…’ : रावसाहेब दानवेंचा उद्धव ठाकरेंना टोला, नेमकं काय म्हणाले?
माध्यमांवरून मिळत असलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेत दोन्ही पक्षांमधील युती जवळजवळ निश्चित असून आता केवळ अधिकृत घोषणाच बाकी आहे. गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावर सातत्याने बैठका सुरू होत्या. या चर्चांची जबाबदारी अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्याकडे होती. जागावाटपाचे बहुतांश गणित जुळले असून काही तांत्रिक मुद्द्यांवर अंतिम शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. (Thackeray Alliance)
हे वाचलात का ?: Thackeray brothers : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पुढील आठवड्यात? राजकीय हालचालींना वेग
ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. त्यामुळे ‘शिवतीर्थ’वरील या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत ठाकरे युतीची औपचारिक घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Thackeray Alliance)