पुणे : (Sheetal Tejwani) मुंढवा जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया इंटरप्रायजेस एलएलपी कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) आणि दस्त नोंदणी करणारे सह दय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तारू हे १९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील याचीही बावधन पोलिसांनी दिवसभर कसून चौकशी केली. (Sheetal Tejwani)
बावधन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) हिला दहा दिवस पोलीस कोठडी द्यावी. अशी मागणी न्यायालयाकडे केली. त्यासाठी त्यांनी विविध कारणे न्यायालयासमोर सादर केली. तेजवानी हिच्या विरोधात २०१५ पासून पिंपरी ठाण्यात चार, खडक आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. तसेच एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या विरोधात न्यायालयीन खटला सुरु आहे. तिने अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. तेजवानीने (Sheetal Tejwani) दस्त तपासणीसाठी जे कागदपत्र जोडण्यात आले होते, ते ऑनलाइन नोंदणीच्या वेळेस काढून दुसरे कागदपत्र लावले. हे दस्त परत तपासून न घेता नोंदरणी करुन घेतलेले आहेत .(Sheetal Tejwani)
हेही वाचा : Local Body Elections : राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी शनिवार २० रोजी मतदान
तेजवानी (Sheetal Tejwani) हिने कागदपत्रामध्ये दाखवलेल्या पत्यावर तीचा कोणताही मालकी अथवा भाड्याने अधिकार नाही. तसेच खोटा पत्ता दिला आहै. या पत्याचा ती जमीनीच्या व्यवहारासाठी दरुपयोग करीत आहे. अशा विविध कारणांसाठी बावधन पोलिसांनी तेजवानी (Sheetal Tejwani) हिला दहा दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे. त्यावर न्यायालयाने तेजवानी हिला दि. २३ डिसेंबर पर्यत सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोरेगाव पार्क - मुंढवा येथील ४० एकर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) ही बनावट कागदपत्रे बनवणे, विश्वासघात, फसवणूक अशा गुन्ह्यात सराईत असून तिची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.(Sheetal Tejwani)
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी पार्थ पवार यांच्या नावाचा उल्लेख असणारी कागदपत्रे आणि अर्ज हे बनावट असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. पार्थ पवारांनी त्या जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठ पुरावा केल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केले होते.(Sheetal Tejwani)