मुंबई : (Raosaheb Danve VS Uddhav Thackeray) महाराष्ट्राच्या राजकारणात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Raosaheb Danve VS Uddhav Thackeray) यांच्यावर थेट आणि धारदार टीका केली आहे. दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही “शेवटची निवडणूक” ठरेल, असा दावा केला आहे.
हेही वाचा : Thackeray brothers : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पुढील आठवड्यात? राजकीय हालचालींना वेग
दानवे म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केल्याने त्यांची राजकीय ताकद कमकुवत झाली आहे. याचा परिणाम आधीच विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आला असून, आता त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे." (Raosaheb Danve VS Uddhav Thackeray)
पुढे बोलताना दानवे यांनी दावा केला की, या महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेले कार्यकर्तेही आपल्या सोयीने इतर पक्षांत प्रवेश करतील. त्यामुळे ठाकरे गटाचा पक्ष हा शेवटची निवडणूक लढत असून, भविष्यात तो अस्तित्वात राहणार नाही, असेही दानवे म्हणाले. (Raosaheb Danve VS Uddhav Thackeray)