ठाणे : (Padma Shri Nivedita Bhide) विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे (Padma Shri Nivedita Bhide) यांनी केंद्राच्या निधी संकलन विभागाच्या माध्यमातून ठाणेकरांशी संवाद साधला. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी ठाणे शाखा यांच्या वतीने मुक्तसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.(Padma Shri Nivedita Bhide)
कार्यक्रम प्रसंगी निवेदिता भिडे (Padma Shri Nivedita Bhide) यांनी सांगितले की, ईशान्य भारतात 1977 पासून विवेकानंद केंद्राने काम सुरु केले आहे. शिक्षण, संस्कृती, भाषा, या माध्यमातून भारताला जोडून ठेवण्याचे काम केंद्र करीत आहे. आसामातील चहाच्या बागेत काम करणाऱ्या मजुरांची मुले लवकर शिक्षण सोडतात, त्यांच्या साठी आनंदालय चालविले जाते. ज्यातून त्यांचे शिक्षण पूर्ण होते आणि स्वतः मधील गुणानुसार स्वावलंबी व्हायला मदत होते. हजारो मुलांना यातून लाभ झाला आहे. हा प्रकल्प ओडिसा, मणिपूर मध्येही चालतो.(Padma Shri Nivedita Bhide)
हेही वाचा : Navnath Ban : नवनाथ बन यांची एक्स हँडलवरून विरोधकांवर टीका
आसाममध्ये केंद्राला ७ शाळा सुरु करण्यासाठी सरकारकडून, जमीन मिळाली आहे. तिकडे दुर्गम भाग असल्याने वसतीगृहासह शाळा असतात, एका शाळेला साधारण १८ कोटीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, मुंबईत भारतातील अनेक भागामधून वैद्यकीय उपचार घ्यायला लोक येत असतात, त्यांच्यासाठी श्रीरामभुवन बांधले जात आहे.
विवेकानंद केंद्र आसाम, मणिपूर, ओडिसा, उत्तर पूर्वाचल, अंदमानमध्ये अनेक समाज उपयोगी कामे गेली 50 वर्षे करीत आहे. विविधतेमधील एकता टिकविण्याचे काम सेवा माध्यमातून केंद्र करीत असल्याचे त्यांनी सांगितले.(Padma Shri Nivedita Bhide)
अनेक प्रकल्पांसाठी मोठा निधी लागतो, तो लोकांनी उदारहस्ते द्यावा असे आवाहन निधी संकलन समितीने केले आहे.
हा कार्यक्रम भा. वि. दाते, दीपक नामजोशी व माधव नानिवडेकर यांनी गुरुवारी श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्थेच्या सभागृहात आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ठाण्यातील अनेक मान्यवर, सेवा क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.(Padma Shri Nivedita Bhide)