मुंबई : (Navnath Ban) भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी आपली एक्स हँडलवरून पोस्ट द्वारे शुक्रवार दि.१९ रोजी विरोधकांवर विशेषतः सामनामधील अग्रलेखाला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.(Navnath Ban)
यात ते लिहितात, "सामना’च्या आजच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा अफवा, कल्पनारंजन आणि राजकीय दिवास्वप्नांचा कळस गाठलेला दिसतो. अमेरिकेत घडलेल्या एपस्टिन प्रकरणाचा आधार घेऊन भारतातील पंतप्रधान बदलले जातील, राजकीय उलथापालथ होईल अशी भाकितं करणं म्हणजे गणपत वाण्याच्या माडी बांधण्याच्या स्वप्नासारखं आहे."(Navnath Ban)
"पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरून स्वप्नरंजन करत देशाचे पंतप्रधान बदलतील, ही कल्पना केवळ हास्यास्पदच नाही तर लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीत सरकार अफवांवर नाही, तर मतपेटीतील कौलावर बनतं. २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये जनतेनं पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना स्पष्ट, ठाम आणि विश्वासार्ह कौल दिला आहे. तो कुठल्याही ‘एपस्टिन भुता’ने बदलता येणार नाही."(Navnath Ban)
हेही वाचा : आत्मनिर्भर भारत साकारण्यात ‘स्वदेशी’ची महत्त्वाची भूमिका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"‘भूत’, ‘भुताटकी’, ‘मानगुटी’, ‘गळा आवळणे’ अशा शब्दांत लेख लिहिणे म्हणजे पत्रकारिता नाही, तर भीतीकथा सांगण्याचा प्रयत्न आहे. झाडाचं पान पडलं तर आभाळ कोसळलं म्हणून अफवा पसरवणाऱ्या ‘भित्र्या सशा’सारखी तुमची अवस्था झाली आहे.आज देशात मजबूत आणि स्थिर सरकार आहे. अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताची जागतिक प्रतिमा अधिक भक्कम होत आहे. हे वास्तव पाहून तुमची अस्वस्थता वाढली आहे. निवडणुकीतील पराभव, नेतृत्वाचा अभाव आणि दिशाहीनता झाकण्यासाठी आता परदेशातील कथित फायलींचा तुम्ही आधार घेत आहात. निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे तुम्हाला बसलेल्या मानसिक धक्क्यातून जरा बाहेर पडा. लवकर बरे व्हा!"(Navnath Ban)