Manikrao Kokate : कोकाटेंचा राजीनामा मंजूर; मंत्रिपद गेले, अटकेसाठी पोलीस ३ तास लीलावतीत, मात्र…

19 Dec 2025 12:22:38
 Manikrao Kokate
 
मुंबई : (Manikrao Kokate) राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनंतर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला. त्यामुळे कोकाटेंचे (Manikrao Kokate) मंत्रिपद अधिकृतपणे गेले असून, त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
 
दरम्यान, कोकाटेंविरोधात (Manikrao Kokate) नाशिक सत्र न्यायालयाने दिलेल्या अटक वॉरंटनंतर नाशिक पोलीस त्यांना अटक करण्यासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. जवळपास तीन तास पोलीस रुग्णालयात तळ ठोकून होते. या दरम्यान पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टर कुलदीप देवरे यांचा जबाब नोंदवला तसेच कोकाटेंच्या (Manikrao Kokate) प्रकृतीविषयी सविस्तर माहिती घेतली.
 
हेही वाचा : Devendra Fadnavis : सातारा ड्रग्स प्रकरणी शिंदेंवरील आरोप राजकीयच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सध्या माणिकराव कोकाटेंवर (Manikrao Kokate) अँजिओग्राफी होणे अपेक्षित आहे. वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अटकेबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्या तरी कोकाटेंना अटक करण्यात आलेली नाही.
 
दरम्यान, नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार असून, न्यायालय काय आदेश देते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0