Manikrao Kokate : शिक्षेच्या स्थगितीसाठी कोकाटे हायकोर्टात! नेमकं प्रकरण काय?

19 Dec 2025 16:12:38
Manikrao Kokate
 
मुंबई : (Manikrao Kokate) सदनिका गैरव्यवहार प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झालेल्या माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कोकाटेंविरोधात नॉन-बेलेबल अटक वॉरंट जारी करण्यात आले असून, ते बजावण्यासाठी नाशिक पोलीस कालपासून मुंबईत दाखल झाले आहेत. (Manikrao Kokate)
 
हेही वाचा : Thackeray Alliance : अनिल परब पुन्हा ‘शिवतीर्थ’वर, मुंबईसह ५ महानगरपालिकांमध्ये ठाकरे युती होणार?
 
दरम्यान, कोकाटे (Manikrao Kokate) हे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असून, याच कारणामुळे त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. नाशिक पोलिसांनी अटक वॉरंटसह रुग्णालयात हजेरी लावली असून, रुग्णालय प्रशासनाकडून आज दुपारी चार वाजता मेडिकल बुलेटीन जाहीर करण्यात येणार आहे. (Manikrao Kokate)
 
उच्च न्यायालयात सरकारी वकिलांनी स्पष्ट केले की, कोकाटे (Manikrao Kokate) यांनी अद्याप न्यायालयात शरणागती पत्करलेली नाही. तर कोकाटेंचे ज्येष्ठ वकील अ‍ॅड. रवींद्र कदम यांनी, कोकाटेंची प्रकृती लक्षात घेता सोमवार किंवा मंगळवारपर्यंत तात्पुरता दिलासा देण्याची विनंती केली आहे. मात्र, अद्याप कोणताही अंतरिम दिलासा देण्यात आलेला नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात कोकाटेंना दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Manikrao Kokate)
 
 
Powered By Sangraha 9.0