Hindutvavadi Sanghatana : तुर्भे नाका परिसरातील धर्मांतरणाचा डाव हिंदुत्ववादी संघटनांनी उधळला

19 Dec 2025 16:51:40
Hindutvadi Sanghatana
 
मुंबई : (Hindutvavadi Sanghatana) नवी मुंबईतील तुर्भे नाका परिसरात धर्मांतरासाठी खुलेआम प्रवृत्त केले जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. गुरुवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास तुर्भे नाका येथील स्कायवॉकजवळ सदर घटना घडली. हिंदुत्ववादी संघटनांच्या (Hindutvavadi Sanghatana) प्रसंगावधानामुळे दोन ख्रिश्चन धर्मियांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.(Hindutvavadi Sanghatana)
 
मिळालेल्या माहितीनुसार, तुर्भे नाका येथील स्कायवॉक येथे दोन इसम येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना काही पॅम्प्लेट वाटप करीत होते. सदर पॅम्प्लेटवर ख्रिश्चन धर्माबददलची माहीती होती. तक्रारदार अभिषेक चव्हाण यांनी जेव्हा ते पॅम्प्लेट पाहिले तेव्हा त्या इसमांनी अभिषेक यांना त्यांच्या धर्माबाबत (Hindutvavadi Sanghatana) विचारणा केली. आणि म्हणाले, 'तुम्हारे धरम में इज्जत नही मिलता, क्या रखा है तुम्हारे धरम में, हमारे धरम में आ जाओ, हम तुम्हे पढाई के लिए पैसे देंगे, राशनपाणी देंगे, हमारा प्रभु ही सबकुछ है.'(Hindutvavadi Sanghatana)
 
हेही वाचा : Manikrao Kokate : शिक्षेच्या स्थगितीसाठी कोकाटे हायकोर्टात! नेमकं प्रकरण काय?
 
दोन्ही इसम धर्मांतरासाठी प्रवृत्त करत असल्याचे लक्षात आल्यानंतर सजग हिंदू नागरिकांनी (Hindutvavadi Sanghatana) तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.(Hindutvavadi Sanghatana)
 
 
 
Powered By Sangraha 9.0