Jagan Sapte : गरीबाची पोरंही आय.ए.एस. आय.पी.एस. अधिकारी होतात - जगन सापटे

19 Dec 2025 15:44:08
Jagan Sapte
 
कल्याण : (Jagan Sapte) सम्राट अशोक विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.‌ शारीरिक शिक्षणाचा तास असूनही प्रथम सत्रात पावसामुळे मुलांना मैदानावरील खेळ खेळता येत नाहीत शाळेव्यतिरिक्त बाहेरील शिकवणी वर्ग इतर विषयांचा अभ्यास यामुळे देखील विद्यार्थ्यांना पुरेसे खेळायला मिळत नाही. वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध खेळ खेळायला मिळतात.‌ त्यामुळे सम्राट अशोक विद्यालयात चार दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कोळसेवाडी कल्याण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जगन सापटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पाटील, संस्थेचे अध्यक्ष पी.टी. धनविजय, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रेम भोईर,स्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड माध्य. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील व प्राथ. मुख्याध्यापिका सुजाता नलावडे उपस्थित होते.(Jagan Sapte)
 
हेही वाचा : Thackeray Alliance : अनिल परब पुन्हा ‘शिवतीर्थ’वर, मुंबईसह ५ महानगरपालिकांमध्ये ठाकरे युती होणार? 
 
जगन सापटे (Jagan Sapte)  म्हणाले, कुस्तीपटू प्रेम भोईर याला खेळाच्या शासकीय कोट्यातून सैन्य दलात नोकरी मिळाली. आवडीने खेळलात तर खेळ वाया जात नाही. आपण गरीब परिवारातले आहोत. शिक्षणाकडे लक्ष द्या. गोरगरिबाची पोरही आता आयएएस, आयपीएस अधिकारी होत आहेत. तुमच्या मधूनही होतील.(Jagan Sapte)
 
रूपाली पाटील म्हणाल्या, आरोग्य महत्त्वाचे आहे खेळ, व्यायाम, योगाच्या माध्यमातून सुदृढ शरीर ठेवता येते. शरीराकडे लक्ष द्या. शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहशिक्षक गणेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर संतोष कदम यांनी आभार मानले.(Jagan Sapte) 
 
Powered By Sangraha 9.0