उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला! आरक्षण आंदोलनात २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न...

19 Dec 2025 14:42:47
Bangladesh
 
मुंबई : ( Bangladesh ) बांग्लादेशातील आरक्षणावर चालू असलेल्या आंदोलनाने आता घातक वळण घेतले आहे. गुरुवार दि. १८ डिसेंबर रोजी संतप्त आंदोलकांनी ढाकास्थित दोन नामांकित वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ला करून इमारतीला आग लावली. या आगीत अनेक पत्रकार आणि कर्मचारी इमारतीतच अडकले होते. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शिडीच्या सहाय्याने अनेकांचे प्राण वाचवले. तर जमावाने दीपू दास या हिंदू तरुणाची निर्घृण हत्या करून, त्याचा मृतदेह झाडाला लटकवून जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हिंदू तरुणाला जमावाने केवळ धर्मावरून लक्ष्य करत त्याची निर्घुण हत्या केली आहे. या घटनेमुळे बांगलादेशातील हिंदू कुटुंबांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
ढाका येथील द डेली स्टारच्या कार्यालयावर आंदोलकांनी अचानक हल्ला करत, कार्यालया बाहेरील वाहनांची मोठ्याप्रमाणात जाळपोळ केली. त्यानंतर आंदोलकांकडून कार्यालयाला देखील आग लावण्यात आली. ज्यामुळे कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत अडकलेल्या कर्मचाऱ्याना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले असले, तरी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
 
हेही वाचा : Raosaheb Danve VS Uddhav Thackeray : ‘ही शेवटची निवडणूक…’ : रावसाहेब दानवेंचा उद्धव ठाकरेंना टोला, नेमकं काय म्हणाले?
 
या आंदोलनाचा म्होरक्या शरीफ उस्मान हादी याचा मृत्यू झाला असला तरी हे आंदोलन अद्याप संपलेले दिसत नाही. आंदोलन आता अधिक तीव्र झाले असून, सध्या बांग्लादेशात इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. सुरक्षतेच्या कारणाने शाळा आणि महाविद्यालये आधीच बंद करण्यात आली आहेत. त्यासोबतच, ढाकासह देशातील अनेक भागांमध्ये लष्कर पथके तैनात करण्यात आली आहेत.
 
Powered By Sangraha 9.0