बँकिंग क्षेत्रातील 'एआय'ची वाढती व्याप्ती

19 Dec 2025 11:31:18
AI in Banking
 
‘एआय’ अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ - कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकाचीच एक शाखा आहे. ‘एआय’ म्हणजे मानवी वर्तनाची नक्कल. अन्य क्षेत्रांप्रमाणे बँकांनीही हे तंत्र मोठ्या प्रमाणात त्यांच्या सेवांमध्ये आत्मसात करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा...
 
सध्याची आकडेवारी असे दर्शविते की, बँकिंग उद्योगसेवा, कार्यक्षमता आणि उत्पादकता सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी ‘एआय’चा वापर करीत आहेत. भारतातील बँकिंग उद्योग ‘एआय’चा प्रमुख लाभार्थी आहे. ग्राहकसेवा आणि सायबर सुरक्षा यात ‘एआय’चा जास्त उपयोग होतो. फसवणूक शोधणे आणि प्रतिबंध करणे यात ‘एआय’ची मोठी भूमिका असते. ऑफिस, बॅक-ऑफिस, गुंतवणूक, मालमत्ता व्यवस्थापन, ठेवी घेणे, कर्जवाटप असा बँकिंगचा प्रत्येक विभाग आता ‘एआय’वर अवलंबून आहे. मानवी समावेश नसलेले व्यवस्थापन बँकांसाठी कमी Monster ठरते. वेग, कार्यक्षमतावृद्धी, सांख्यिकी माहितीचे वर्गीकरण यात ‘एआय’ महत्त्वाची भूमिका बजावते. काही बँकात ‘एआय’बाबतची प्रक्रिया सुरू आहे; तर काहींनी आपल्या कामकाजात ‘एआय’चा पूर्णपणे समावेश केला आहे.
 
चॅटबॉट्स
 
बँकिंगमध्ये ‘एआय’च्या व्यावहारिक वापराचे चॅटबॉट्स हे एक योग्य उदाहरण आहे. एकदा कार्यरत झाल्यावर ते २४ बाय ७ काम करतात. माणसांप्रमाणे त्यांचे कामाचे तास निश्चित नसतात. ग्राहकांची गरज समजून घेऊन, चॅटबॉट्स व्यक्तिगत ग्राहकसेवा देऊ शकतो.
 
घोटाळ्यांचा शोध आणि सायबर सियुरिटी
 
सायबर गुन्हेगारांद्वारे फसवणुकीच्या अनेक घटना घडतात, अशा वेळी बँकिंगमधील ‘एआय’ व ‘मशीन लर्निंग’ हे बँकांना फसवणुकीच्या क्रिया ओळखण्यास, त्यांच्या यंत्रणेमधील पळवाटा शोधण्यास, जोखीम कमी करण्यास, एकंदर सुरक्षा सुधारण्यास मदत करतात. ‘एआय’ आधारित फ्रॉड डिटेशन यंत्रणा, काही प्रकरणे पुढील तपासणीसाठी मानवी विश्लेषकांकडे पाठविताना ‘केस’बाबत बरीच माहिती हाती असते. प्रगत ‘एआय’ प्रणालीच्या सततच्या देखरेख क्षमतेमुळे संभाव्य सायबर हल्ल्यांना अंतर्गत प्रणालींवर परिणाम करण्यापूर्वीच ओळखून प्रतिकार केला जाऊ शकतो.
 
कर्ज निर्णय
 
बँकांनी अधिक माहितीपूर्ण, सुरक्षित आणि फायदेशीर कर्जवितरणाबाबत निर्णय घेण्यासाठी ‘एआय’आधारित प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ‘एआय’ आधारित कर्जप्रणाली, ग्राहकांची पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांचे आर्थिक वर्तन पाहू शकते. त्यामुळे ‘डिफॉल्ट’ची शयता कमी होते. सध्या ‘एनपीए’ ही बँकांची डोकेदुखी आहे, ती ‘एआय’ने कमी होईल.
 
डेटा संकलन
 
सध्या डेटा संकलन करणे हे कर्मचार्‍यांसाठी फार जिकिरीचे काम आहे, यासाठी तासही बरेच लागतात. आधुनिक ‘एआय’ आणि बँकिंग सॉफ्टवेअर डेटा संकलन आणि विश्लेषण करण्यास मदत करते.
 
मार्केट ट्रेंड
 
‘एआय’ बँकांना मोठ्या प्रमाणात डेटावर प्रक्रिया करण्यास आणि बाजारपेठेतील नवीन ट्रेंडचा अंदाज लावण्यास मदत करते. प्रगत मशीन लर्निंग तंत्र गुंतवणुकीचे पर्याय सूचविण्यासही मदत करते. ‘एआय’ सोल्यूशन्स शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ सूचवितात आणि जोखीम असल्यास सावध करतात.
 
ग्राहक सेवा
 
‘एआय’मुळे बँकिंग सुविधा अधिक ग्राहकपयोगी झाल्या आहेत. वैयक्तिक कर्ज किंवा इतर कर्जासाठी अर्जप्रक्रिया ‘एआय’ स्वयंचलित होते. या संपूर्ण प्रक्रियेत दीर्घ काळ सहभागी होण्याचा ग्राहकांचा त्रास दूर होतो. कमी वेळेत कर्ज मंजूर होते.
 
रिस्क मॅनेजमेंट
 
बँकिंगमधील असे विश्लेषण करते की, भविष्यातील घटनांचे वाजवी चित्र स्पष्ट करते आणि त्यासाठी तयार राहण्यास आणि वेळेवर योग्य निर्णय घेण्यास मदत करते. एखादा ग्राहक कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरणार असेल, तर त्याच्या कारणांचे मूल्यांकन ही करू शकते.
 
रेग्युलेटरी कम्प्लायन्स
 
कम्प्लायन्सचे नियम नेहमी बदलत असतात आणि बँकांना हे नियम पाळून त्यांची अंमलबजावणी करावी लागते. अशा वेळी जरी ‘एआय’ बँकिंगमधील हे काम करणार्‍या अधिकार्‍यांची जागा घेऊ शकत नसले, तरी यामुळे कामकाज जलद व अधिक कार्यक्षम होऊ शकते. बँकिंग उद्योगात ‘एआय’चा प्राथमिक वापर म्हणजे भाषेचा अर्थ लावणे आणि व्यापक विश्लेषण करणे. ‘एआय’ डेटामधील विशिष्ट दाखले आणि सहसंबंध शोधू शकते. जे पारंपरिक तंत्रज्ञान पूर्वी शोधू शकत नव्हते. हे नमुने नव्या विक्रीच्या संधी, बाजार उपलब्धता तसेच व्यावहारिक शयता दर्शवू शकतात. परिणामी, महसूल वाढू शकतो.
 
‘एआय’मधील अल्गोरिदम हे कामकाजातील कार्यक्षमता आणि अचूकता वाढवितात. तसेच वेळखाऊ, पुनरावृत्ती कामे स्वयंचालित करून खर्च कमी करतात. पूर्ण प्रमाणात आधारित बँकिंग प्रणाली लागू करण्याअगोदर बँक कर्मचार्‍यांना योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. ‘एआय’वर काम करू शकणारे कुशल डेटा ऑपरेटर अजून फार उपलब्ध नाहीत. मात्र, मनुष्यबळ, आधुनिक संसाधने, नवी उपकरणे आणि अद्ययावत सॉफ्टवेअर यांचीही कमतरता आहे. ग्राहकांच्या गरजा, सरासरी बौद्धिक पातळी आणि ‘एआय’ प्रणाली यांची योग्य सांगड घातली, तरच या आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला फायदा होऊ शकतो. भारतात ग्राहकांच्या भाषांचे वैविध्य लक्षात घेता, इंग्रजी व हिंदीबरोबरच इतर स्थानिक भाषांमध्ये संपर्क साधणारी ‘एआय’ प्रणाली जास्त यशस्वी ठरू शकते. ही प्रणाली स्थानिक भाषांवर प्रक्रिया आणि आकलन करू शकणारी आवश्यक असते. त्यासाठी स्थानिक भाषांचा यंत्रवाचनीय कोष आणि त्यासंबंधी अल्गोरिदम तयार करणे ही मोठी अडचण आहे. अशा प्रकारे मात करून भारतीय बँकिंगला ‘एआय’च्या जागतिक नकाशावर आणण्यासाठी भारतीय प्रयत्नशील आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0