Jan Andolan : घाटकोपर पूर्व वल्लभबाग लेन व टिळक रोडवरील अनधिकृत फेरीवाले व वाहतूक कोंडीविरोधात जनआंदोलन

19 Dec 2025 19:39:04
Jan Andolan

मुंबई : (Jan Andolan) घाटकोपर पूर्व येथील वल्लभबाग लेन व टिळक रोड परिसरात वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे व सातत्याने होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. या समस्येबाबत नागरिकांकडून सातत्याने महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही योग्य ती कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग अवलंबला.(Jan Andolan)
 
आज दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी, घाटकोपर पूर्वचे सेवाभावी आमदार मा. पराग शाह यांच्या नेतृत्वाखाली वल्लभबाग लेन व टिळक रोड येथे अनधिकृत फेरीवाले व वाहतूक कोंडीविरोधात भव्य जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे (Jan Andolan) नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारत तात्काळ व ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली.(Jan Andolan)
 
हेही वाचा : Chandan Sharma : चंदन शर्मा यांचा भाजपमध्ये प्रवेश
 
या दोन्ही रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाल्यांमुळे रस्ते अरुंद झाले असून, त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे. यामुळे वाहनचालक, पादचारी, स्थानिक रहिवासी, विद्यार्थी व व्यापारी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आमदार पराग शाह यांच्या नेतृत्वाखाली हे जनआंदोलन उभारण्यात आले.(Jan Andolan)
 
या आंदोलनात (Jan Andolan) स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच घाटकोपर पूर्व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. जनआंदोलनाच्या (Jan Andolan) माध्यमातून प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्यास भाग पाडण्यात आले असून, लवकरच या परिसरातील अनधिकृत फेरीवाले हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.(Jan Andolan)
  
Powered By Sangraha 9.0