Badlapur Station : बदलापूर स्थानकावर एमआरव्हीसीकडून पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती

18 Dec 2025 19:01:31
Badlapur Station
 
मुंबई : (Badlapur Station) प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे, प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि कल्याण–बदलापूर (Badlapur Station) दरम्यान प्रस्तावित तिसरी व चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याच्या दृष्टीने मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) बदलापूर रेल्वे स्थानकावर (Badlapur Station)  पायाभूत सुविधांच्या कामात लक्षणीय प्रगती करत आहे. (Badlapur Station) 
 
प्रवाशांची हालचाल सुलभ करण्यासाठी आणि ट्रॅक ओलांडण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एमआरव्हीसीने आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या सुविधा कार्यान्वित केल्या आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये ३३० मीटर लांबीचा होम प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. त्याआधी डिसेंबर २०२२ मध्ये कर्जत टोकाला ६ मीटर रुंदीचा पादचारी पूल (FOB) सुरू करण्यात आला होता. हा पूल सर्व प्लॅटफॉर्मना जोडत असून पूर्व–पश्चिम दिशेने सर्वसामान्य नागरिकांसाठी अखंड संपर्क उपलब्ध करून देतो. याशिवाय मार्च व जून २०२५ मध्ये प्रत्येकी १२ मीटर रुंदीचे दोन नवीन पादचारी पूल प्रवाशांसाठी खुले करण्यात आले. (Badlapur Station)
 
या दोन १२ मीटर रुंदीच्या पुलांना जोडणारा उन्नत डेक सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर उभारण्यात येत आहे. सुमारे ११८ x १८ मीटर आकाराचा डेकचा मोठा भाग तसेच मधला १२ मीटर रुंदीचा पूल मार्च २०२५ मध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे. जुन्या ४ मीटर रुंदीच्या मध्यवर्ती पुलाचे विघटन केल्यानंतर उर्वरित ३४ x १८ मीटर आकाराच्या डेकचे काम हाती घेण्यात आले आहे. (Badlapur Station)
 
हेही वाचा : Central Railway : मध्य रेल्वेची तिकीटविरहित प्रवाशांविरोधात कडक कारवाई  
 
अलीकडेच, १३-१४ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२ ते सकाळी ६ या सहा तासांच्या नाईट ब्लॉकमध्ये एमआरव्हीसीने उन्नत डेकसाठी उर्वरित १७ गर्डर, त्यात प्रमुख क्रॉस गर्डरचाही समावेश, यशस्वीरित्या बसले. ४० कर्मचाऱ्यांच्या पथकाने, १५० टन क्षमतेचा एक क्रेन आणि १५ टन क्षमतेच्या दोन फराणा क्रेनच्या मदतीने, अत्यंत गर्दीच्या ठिकाणी हे काम सुरक्षित आणि कार्यक्षमतेने पूर्ण केले. (Badlapur Station)
 
प्रवासी सुविधांचाही टप्प्याटप्प्याने विकास सुरू आहे. प्लॅटफॉर्म १ वर चार जिने व एक एस्केलेटर सुरू असून, पुढील महिन्यांत एक लिफ्ट व आणखी एक एस्केलेटर बसवण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म २ वर तीन जिने व दोन एस्केलेटर कार्यरत असून, येत्या तीन महिन्यांत एक लिफ्ट व एक जिना जोडण्यात येईल. प्लॅटफॉर्म ३ वर तीन जिने सुरू असून, पुढील ३०-४० दिवसांत दोन एस्केलेटर कार्यान्वित केले जाणार आहेत. (Badlapur Station)
 
तसेच, प्लॅटफॉर्म १ च्या कल्याण टोकाला नवीन तिकीट कार्यालय आणि सार्वजनिक शौचालयाचे काम सहा ते सात महिन्यांत पूर्ण होणार आहे. कल्याण टोकाला आणखी एक ६ मीटर रुंदीचा पादचारी पूल, पूर्व व पश्चिम बाजूंच्या स्कायवॉकला जोडण्यासाठी प्रस्तावित आहे. यासोबतच पूर्व बाजूला स्कायवॉक, उन्नत तिकीट कार्यालय, नवीन स्थानक इमारत आणि सर्क्युलेटिंग एरिया उभारण्याचे नियोजन आहे. सध्या सुरू असलेली सर्व कामे पुढील ५-६ महिन्यांत पूर्ण होणार असून, तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेशी संबंधित अतिरिक्त कामे नवीन मार्गिका सुरू होताच एकत्रितपणे पूर्ण केली जाणार आहेत. (Badlapur Station)
 
 
Powered By Sangraha 9.0