Navnath Ban : महापौर प्रश्नावर राऊत यांचा गोंधळ खूप काही सांगून जातो - नवनाथ बन

18 Dec 2025 13:47:20
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) "संजय राऊत महापौराच्या प्रश्नावर गोंधळलेले पाहायला मिळाले असून. महापौर कोणाचा? या प्रश्नाने उबाठा गटाची अस्वस्थता उघडी झाली आहे.निवडणूक जवळ येताच राऊतांच्या पत्रकार परिषदेतून भीती स्पष्ट दिसते आहे. मुंबईकरांचा कौल भाजप,महायुतीसोबतच आहे. मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार असून महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे."असे रोखठोक मत भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी गुरुवार दि.१८ रोजी प्रदेश कार्यालय,मुंबई येथे व्यक्त केले.(Navnath Ban)
 
"माणिकराव कोकाटेंची खाती काढून घेतली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कुणालाही वाचवत नाही.महाविकास आघाडीच्या काळातील ढिम्म कारभार राऊत विसरले का? नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी आघाडी सरकारच्या काळात तेव्हा लगेच घेतला न्हवता? कोकाटे यांच्याबाबत कोर्टाचा आदेश मिळताच योग्य ती कारवाई होणारच आहे. जो निर्णय होईल तो नियम, प्रक्रिया आणि पुराव्यांवरच होईल ना की कुणाच्या दबावाखाली." असेही बन म्हणाले.(Navnath Ban)
 
"पक्ष फोडीची सुरुवात उद्धव ठाकरेंनीच केली याबाबतचा इतिहास राऊतांनी वाचावा.मनसेचे सात नगरसेवक फोडणारे आज नैतिकतेच्या गप्पा मारतायत.२०१९ मध्ये युती तोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी कोणी लावली? जैसी करणी वैसी भरणी हे उबाठा गटाने ध्यानात ठेवाव." असेही बन (Navnath Ban) यांनी स्पष्ट केले.
" धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा नाही आहे. धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतलेली भेट आणि मंत्रिमंडळाचा काहीही संबंध नाही.तसेच मंत्रिमंडळ रचना हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे राऊतांचा नाही." असेही स्पष्टीकरण बन (Navnath Ban) यांनी दिले.
 
 
हेही वाचा : Sanjay Raut meets Sharad Pawar : राऊतांकडून शरद पवारांची भेट; २० ते २५ मिनिटे चर्चा, नेमकं घडतंय काय? 
 
"टप्प्याटप्प्याने उबाठा गटाचाच गेम होत असून जनता निकाल देत आहे. लोकसभा विधानसभा नंतर आता महापालिकेत अंतिम टप्पा आला आहे. खरेतर काँग्रेस आणि मनसेकडून उबाठा गट कोंडीत सापडला आहे. तसेच २०१७ च्या वेळी पाठीत खंजीराचा हिशेब आता चुकता होणार आहे." असेही बन (Navnath Ban) यांनी प्रतिपादन केले.
 
"भाजप कुणाचा पक्ष गिळत नाही उलट उद्धव ठाकरेंनी स्वतःच शिवसेना संपवली असून वंदनीय बाळासाहेबांचे विचार काँग्रेससोबत जाऊन संपवले. आमच्या महायुतीतील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या जोडीला राज्यात दोन तृतीयांश बहुमत आणि ८० टक्के स्ट्राईक रेट तर उबाठा गटाचा स्ट्राइक रेट २० टक्केच आहे." असे बन (Navnath Ban) यांनी स्पष्ट केले.
 
"महाराष्ट्र कुठेही ड्रग्सच्या विळख्यात सापडले नाही.याउलट ड्रग्स मुक्त महाराष्ट्र हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केलं जात आहे.खरतर राज्य महाविकास आघाडीच्या काळात भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडले होते." असेही बन (Navnath Ban) म्हणाले.
 
"एक दिवस संजय राऊत स्वतःलाच पक्षप्रमुख म्हणून घोषित करतील याची काळजी उबाठा ने घ्यावी.कारण ते स्वतःच सर्व भेटी घेत आहेत.तसेच आशिष शेलारांच्या कवितेने राऊत अस्वस्थ झाले आहेत. म्हणूनच टीकेचा भडिमार सुरू आहे. खोटं बोलण्याचा पुरस्कार असेल तर राऊत पहिल्या क्रमांकावर येतील.फेकाफेकी आणि एंटरटेनमेंटमध्ये राऊतांचा हातखंडा आहे." असेही बन (Navnath Ban) म्हणाले.
 
"भाजपमध्ये दररोज कार्यकर्ते आणि नेते प्रवेश करत आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत गुरुवार दि.१८ रोजीही महत्त्वपूर्ण प्रवेश होत असून भाजपवर जनतेचा विश्वास वाढतोय. आम्ही पक्षात येणाऱ्या लोकांच नेहमीच स्वागत करतो." असेही त्यांनी स्पष्ट केले.(Navnath Ban)
 
 
Powered By Sangraha 9.0