Ram Sutar Passes Away : शिल्पकलेतील राम हरपला; महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन

18 Dec 2025 11:56:12
 
Ram Sutar Passes Away
 
मुंबई : (Ram Sutar Passes Away) शिल्पकलेतील भीष्माचार्य, जागतिक किर्तीचे शिल्पकार आणि 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित राम सुतार यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय शिल्पकलेचे एक युग संपले असले, तरी महापुरुषांना अजरामर करणाऱ्या त्यांच्या हातांनी साकारलेल्या मूर्ती देश-विदेशात आजही इतिहास आणि संस्कृतीची साक्ष देत उभ्या आहेत. (Ram Sutar Passes Away)
 
हेही वाचा : ‘पृथ्वीराज घोरी’चे फुसके वाग्बाण!
 
या वर्षाच्या सुरुवातीलाच राम सुतार यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर करण्यात आला होता. २० मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याची अधिकृत घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राम सुतार हे जागतिक ख्यातीचे शिल्पकार होते. २०१६ मध्ये त्यांना पद्मभूषण, तर १९९९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या कलाकृतींमध्ये भारतीय इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रीय अस्मितेचे दर्शन घडते. (Ram Sutar Passes Away)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सुतार यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत, “जिवंत मूर्ती साकारणारा जागतिक कीर्तीचा उमदा कलाकार आपण गमावला आहे. त्यांच्या शिल्पांच्या माध्यमातून त्यांची कला शतकानुशतके स्मरणात राहील,” अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. (Ram Sutar Passes Away)
 
हे वाचलात का ?: ऑस्ट्रेलिया दहशतवादी हल्ल्यातून योग्य धडा शिकणार का? 
 
राम सुतार यांच्या गाजलेल्या शिल्पकृती
 
राम सुतार यांनी साकारलेला गुजरातमधील केवडिया येथील १८२ मीटर उंच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' (सरदार वल्लभभाई पटेल) हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. मालवण-राजकोट येथील समुद्रकिनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी पुत्र अनिल सुतार यांच्यासह साकारला. देश-विदेशात उभारलेले महात्मा गांधींचे पुतळे, भगवान बुद्ध, महावीर, स्वामी विवेकानंद तसेच अंदमानमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा हे सर्व पुतळे त्यांच्या कलेची साक्ष आहेत. वयाच्या १०० व्या वर्षीही ते इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामात सक्रिय होते. संसद भवन परिसरातील अनेक शिल्पेही त्यांनीच साकारली आहेत. (Ram Sutar Passes Away)
 
 
Powered By Sangraha 9.0