Donald Trump : टॅरिफ हा माझा आवडता शब्द; १० महिन्यांत ८ युद्धे थांबवली, ट्रम्प यांचा दावा

18 Dec 2025 14:58:24


Donald Trump:
 
मुंबई : (Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी ते आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत येतात तर कधी ते आपल्या धक्कादायक निर्णयांमुळे चर्चेचा विषय ठरत असतात. अशातच आता पुन्हा एकदा ट्रम्प आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. आता त्यांनी स्वत: ची पाठ थोपटून घेतली आहे. ते म्हणाले... माझे निर्णय धोरणांमुळे जगात बरीच उलथापालथ झाली. जगातील अनेक युद्ध थांबवल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला. आपण केवळ दहा महिन्यात आठ युद्ध संपवली. सोबतच टॅरिफ हा माझा आवडता शब्द असल्याचंही ट्रम्प यावेळी म्हणाले.
 
टॅरिफ हा माझा आवडता शब्द
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, टॅरिफ हे केवळ अमेरिकेची आर्थिक शक्ती दाखवत नाहीत, तर जागतिक पातळीवर दबाव निर्माण करण्याचे साधन ठरले आहेत. टॅरिफ हा माझा आवडता शब्द आहे, असं म्हणत त्यांनी आपल्या व्यापार धोरणाचे समर्थन केले. यामुळे अमेरिकेच्या उद्योगांना संरक्षण मिळाले आहे, तसेच महसुलातही मोठी वाढ झाली, असा दावा ट्रम्प यांनी केला.
 
ट्रम्प यांनी कोणत्या देशांवर किती टॅरिफ लावले?
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० हून अधिक देशांवर टॅरिफ लादले आहेत. मुख्य बाब म्हणजे ट्रम्प यांनी भारत आणि ब्राझिलवर सर्वात जास्त टॅरिफ लावले आहेत. भारतावर त्यांनी ५० टक्के कर लागू केला असून यामध्ये रशियाकडून तेल खरेदीमुळे अतिरक्त २५ टक्के कराचा समावेश आहे. ब्राझीलवर ट्रम्प यांनी ५० टक्के, व्हेनेझुएलावर २५ टक्के, मेक्सिकोवर विविध वस्तूंवर ५ ते ५० टक्के टॅरिफ लादले आहे.
 
ट्रम्प यांचा दावा: टॅरिफच्या दबावामुळे ८ युद्धे थांबली
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२५ मध्ये टॅरिफ आणि आर्थिक दबावाच्या माध्यमातून जगातील आठ युद्धे थांबवल्याचा दावा केला आहे. व्यापार शुल्क, निर्बंध आणि थेट राजनैतिक इशाऱ्यांमुळे संबंधित देशांनी माघार घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, भारत–पाकिस्तान, थायलंड–कंबोडिया या संघर्षांमध्ये टॅरिफचा थेट परिणाम दिसून आला. याशिवाय इस्रायल–इराण, रवांडा–काँगो, सर्बिया–कोसोवो, इजिप्त–इथिओपिया, आर्मेनिया–अझरबैजान आणि इस्रायल–हमास (गाझा संघर्ष) या संघर्षांमध्येही अमेरिकेच्या दबावामुळे तणाव कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
गाझातील संघर्ष थांबण्यात आपल्या धोरणांची निर्णायक भूमिका असल्याचाही ट्रम्प यांनी दावा केला. “टॅरिफ हे केवळ व्यापारासाठी नाही, तर युद्ध थांबवण्यासाठीही प्रभावी शस्त्र आहे,” असे ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0