नवी दिल्ली : (Indian Railway Catering and Tourism Corporation) प्रवाशांना दर्जेदार, स्वच्छ आणि चविष्ट भोजन सेवा देण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (Indian Railway Catering and Tourism Corporation) निवडक वंदे भारत व अमृत भारत गाड्यांमध्ये प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट (PoC) स्वरूपात विशेष भोजन सेवा चाचण्या सुरू केल्या आहेत. सध्या आयआरसीटीसी दररोज सुमारे १६.५० लाख भोजन पुरवठा करत असून सेवांच्या गुणवत्तेत मूलभूत बदल घडवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम राबवला जात आहे.(Indian Railway Catering and Tourism Corporation)
हेही वाचा : Badlapur Station : बदलापूर स्थानकावर एमआरव्हीसीकडून पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती
या उपक्रमांतर्गत भोजन उत्पादन आणि सेवा पुरवठा वेगळा ठेवत प्रतिष्ठित फूड अॅण्ड बेव्हरेज ऑपरेटर, रेस्टॉरंट चेन आणि फ्लाइट केटरर्स यांना जोडण्यात आले आहे. नागपूर–सिकंदराबाद, दिल्ली–सीतामढी, अहमदाबाद–वेरावल, कटरा–श्रीनगर अशा विविध मार्गांवरील गाड्यांमध्ये हा प्रयोग सुरू आहे. (Indian Railway Catering and Tourism Corporation) या माध्यमातून प्रवाशांना रेस्टॉरंट दर्जाचे, विविध आणि स्थानिक चवीचे मेन्यू उपलब्ध होत असून प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या चाचण्यांतून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे भविष्यात आयआरसीटीसीच्या केटरिंग सेवांमध्ये व्यापक सुधारणा करण्याचे नियोजन आहे.(Indian Railway Catering and Tourism Corporation)