Lieutenant Inayat Vats : बापासाठी लेकीची अनोखी श्रद्धांजली... अभिमानानं उर भरून येणारा क्षण

18 Dec 2025 17:30:18
Lieutenant Inayat Vats
 
मुंबई : (Lieutenant Inayat Vats) वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या सैन्यसेवेचा वारसा पुढे नेत देशसेवेसाठी उभ्या राहिलेल्या 'लेफ्टनंट इनायत वत्स' (Lieutenant Inayat Vats) या तरुण पिढीसाठी आदर्श ठरत आहेत. भारतीय सैन्यातील मेजर नवनीत वत्स यांची कन्या असलेल्या इनायत (Lieutenant Inayat Vats) यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले ध्येय गाठले आहे.
 
अवघ्या तीन वर्षांच्या वयात लेफ्टनंट इनायत वत्स यांनी भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या आपल्या वडिलांना गमावले. मात्र, वडिलांच्या बलिदानाची जाणीव त्यांच्या आयुष्यात प्रेरणास्थान ठरली. लहानपणापासूनच वडिलांचा गणवेश परिधान करून देशसेवा करण्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजले होते व तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेफ्टनंट इनायत वत्स (Lieutenant Inayat Vats) यांनी भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला आहे.(Lieutenant Inayat Vats)
 
'लेफ्टनंट इनायत वत्स' यांचे पदवी व पदवीव्युत्तर शिक्षण...
 
लेफ्टनंट इनायत वत्स (Lieutenant Inayat Vats) या पंचकुला, हरियाणाच्या आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातील लेडी श्री राम कॉलेजमधून पदवी प्राप्त केली असून हिंदू कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (ओटीए) मध्ये प्रवेश घेतला. हरियाणा सरकारने त्यांना राजपत्रित पदाची ऑफर दिली होती, परंतु त्या आपल्या सैन्य भरती होण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्या.(Lieutenant Inayat Vats)
 
हेही वाचा : Donald Trump : टॅरिफ हा माझा आवडता शब्द; १० महिन्यांत ८ युद्धे थांबवली, ट्रम्प यांचा दावा
 
आता इनायत वत्स (Lieutenant Inayat Vats) भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. २००३ मध्ये काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान 'मेजर नवनीत वत्स' शहीद झाले. त्यांना मरणोत्तर सेना पदकही देण्यात आले. इनायतच्या या निर्णयामुळे, तिच्या वडिलांचा आणि कर्नल आजोबांचा देशभक्तीचा वारसा चिरंतर राहिल.(Lieutenant Inayat Vats)
 
इनायत वत्स (Lieutenant Inayat Vats) यांच्या या प्रवासाकडे केवळ वैयक्तिक यश म्हणून न पाहता ते एका सैनिकाच्या कुटुंबाने देशासाठी दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.(Lieutenant Inayat Vats)
 
Powered By Sangraha 9.0