मुंबई : (Prithviraj Chavan) काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील त्यांच्या वक्तव्यावर माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या लष्करी संघर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ७ मे २०२५ रोजी भारतीय वायूदलाचा पूर्णपणे पराभव झाला होता, असे विधान त्यांनी (Prithviraj Chavan) केले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता चांगल वाद निर्माण झाला आहे. (Prithviraj Chavan)
हेही वाचा : Manikrao Kokate : अटकेची टांगती तलवार; माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल, नेमकं झालंय काय?
मात्र, "मी माफी मागणार नाही... काहीही चुकीचे बोललो नाही, ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपला पराभव झालाच आहे आणि माफी मागण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही," असे ठाम मत चव्हाण यांनी बुधवार दि. १७ डिसेंबर रोजी व्यक्त केले. पुढे ते (Prithviraj Chavan) म्हणाले, “मला आता अधिक काही बोलायचे नाही. माझ्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे. मी कोणतेही चुकीचे भाष्य केलेले नाही,”असे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहणे पसंत केले. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारतीय हवाई दल ‘पूर्णपणे ग्राउंडेड’ झाल्याचे विधान केले होते. ज्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. (Prithviraj Chavan)
हे वाचलात का ?: PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इथिओपिया संसदेत भाषण; दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे केले आवाहन
दरम्यान, आज सकाळीही चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि, ते काहीही चुकीचे बोललेले नाहीत आणि त्यांना त्यांनी बोललेल्या कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप नाही, त्यामुळे ते माफी देखील मागणार नाहीत, मात्र त्यांच्या या विधानावर आता राज्यभरातून टीका केल्या जात आहेत. (Prithviraj Chavan)