मुंबई : (Manikrao Kokate) सदनिका गैरव्यवहार प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले असून, त्यांना पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर आता त्यांच्या अटकेची दाट शक्यता निर्माण झाली असून, आमदारकी आणि मंत्रिपद दोन्ही धोक्यात आले आहे. (Manikrao Kokate)
हेही वाचा : हिंसेचा उलटा लाल त्रिकोण
या घडामोडी घडत असतानाच माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली. कोकोटे (Manikrao Kokate) यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांना चार दिवसाचा दिलासा देण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली होती. पण न्यायालयाने ही विनंती फेटाळत त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. तर जोपर्यंत कोर्टाच्या निकालाची सत्यप्रत प्राप्त होत नाही, तोपर्यंत कोकाटे यांची आमदरकी रद्द करण्याविषयी निर्णय घेता येणार नसल्याचे माध्यमांवरून समोर येत आहे. (Manikrao Kokate)
मात्र, आता यावरून विरोधकांनी तीव्र टीका करत, “राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत असताना रुग्णालयात दाखल असल्याचे कारण दिले जात आहे,” असा आरोप केला आहे. कोकाटे हे सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे माध्यमांवरून समजत आहे. (Manikrao Kokate)