मुंबई : (Manikrao Kokate) १९९५ च्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असतानाच, माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, कोकाटे (Manikrao Kokate) सध्या लीलावती रुग्णालयाच्या अकराव्या मजल्यावर उपचार घेत आहेत. अटक वॉरंट जारी झाल्यानंतर पोलीस त्यांच्या शोधात होते. दरम्यान, कोकाटे (Manikrao Kokate) रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळताच लीलावती रुग्णालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यासोबतच, न्यायालयाकडून अटकेच्या आदेशाची अधिकृत प्रत प्राप्त झाल्यानंतरच पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
हेही वाचा : Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या; अटकेचे वॉरंट जारी, मंत्रिपदही धोक्यात, मात्र कोकाटे रुग्णालयात, नेमकं घडतयं काय?
नेमकं प्रकरण काय ?
हे संपूर्ण प्रकरण १९९५ मधील सदनिका गैरव्यवहाराशी संबंधित आहे. सरकारी १० टक्के कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर असून, या प्रकरणात न्यायालयाने सुनावलेली शिक्षा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे. त्यानंतर सरकारी पक्षाच्या पाठपुराव्यामुळे हे अटक वॉरंट जारी करण्यात आले.
दरम्यान, या घडामोडींमुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद दोन्ही धोक्यात आले असून, सरकार आणि प्रशासन पुढे काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Manikrao Kokate)