Exotic Bird Park : मुलुंड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘विदेशी पक्षी उद्यानाचे’ भूमिपूजन

16 Dec 2025 14:14:40
 Exotic Bird Park
 
मुंबई : (Exotic Bird Park) मुलुंडमध्ये साकार होणारे विविध विकास प्रकल्प हे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणारे असून परिसराचा कायापालट करणारे ठरणार आहेत. त्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘विदेशी पक्षी उद्यान’. (Exotic Bird Park) हे प्रकल्प पर्यावरणपूरक व निसर्गाशी सुसंगत असून यामुळे मुंबईचे वैभव वाढेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.(Exotic Bird Park)
 
मुंबईच्या उपनगरीय भागात पर्यटनाचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुलुंड (पश्चिम) येथील नाहूर परिसरात अत्याधुनिक ‘विदेशी पक्षी उद्यान’ (Exotic Bird Park) उभारण्यात येणार आहे. या पक्षी उद्यानाचे भूमिपूजन मंगळवार, १४ डिसेंबर रोजी सायंकाळी पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित केले.(Exotic Bird Park)
 
राज इंडस्ट्रियल इस्टेटच्या मागे, डी.पी. रोड, सालपादेवी पाडा, मुलुंड (पश्चिम) येथे हा कार्यक्रम झाला. याचवेळी महानगरपालिका संचालित मनसादेवी तुलसीराम अगरवाल सर्वसाधारण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.(Exotic Bird Park)
 
हेही वाचा : Mangalprabhat Lodha : सैफी हॉस्पिटल प्रशासनाची मनमानी चालू देणार नाही
 
उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलुंडच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्प राबविले जात असल्याचे सांगितले. तर पालकमंत्री आशिष शेलार यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सान्निध्यात उभे राहणारे विदेशी पक्षी उद्यान (Exotic Bird Park) मुलुंडसाठी अभिमानास्पद ठरेल, असे नमूद केले.
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रस्तावित पक्षी उद्यान (Exotic Bird Park) तसेच म. तु. अगरवाल रुग्णालयाच्या नवीन इमारतीची चित्रफीत सादर करण्यात आली. या सोहळ्यास पालकमंत्री आशिष शेलार, आमदार मिहिर कोटेचा, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.(Exotic Bird Park)
 
Powered By Sangraha 9.0