Sanjay Raut Vs Eknath Shinde : राऊतांची उपमुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती टीका, म्हणाले, “रहमान डकैत कोण आहेत हे...”

16 Dec 2025 16:34:48
 Sanjay Raut Vs Eknath Shinde
 
मुंबई : (Sanjay Raut Vs Eknath Shinde) मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरून चर्चांना वेग आला असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Vs Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
 
राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब होईल, असे संकेत संजय राऊत (Sanjay Raut Vs Eknath Shinde) यांनी दिले. येत्या काही दिवसांत युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीच मुंबई महापालिका निवडणुका जिंकेल," असा दावा केला आहे.
 
 हेही वाचा : Mumbai BMC Election: “जे हिंदुत्वाचे नाही झाले… ते मराठी माणसाचे...”, मुंबईभर ठाकरेंवर निशाणा साधणारे पोस्टर्स, पण पोस्टर्सवर नेमकं लिहिलंय काय?
 
याच पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत (Sanjay Raut Vs Eknath Shinde) यांनी “रहमान डकैत कोण आहेत?” या प्रश्नावरून थेट हल्लाबोल करत, “मुंबईच्या तिजोरीला वेटोळे घालून घोटाळे करणारे रहमान डकैत कोण आहेत, हे संपूर्ण मुंबईला आणि महाराष्ट्राला माहीत आहे,” असा घणाघाती आरोप केला आहे.
 
दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर वाढलेली ही शाब्दिक चकमक मुंबईतील राजकारण अधिक तापवणार असल्याचे स्पष्ट दिसत असून, येत्या काळात आरोप-प्रत्यारोपांची धार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (Sanjay Raut Vs Eknath Shinde)
 
 
Powered By Sangraha 9.0