Sanjay Raut meets Raj Thackeray : मुंबईसह ५ महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती, नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

16 Dec 2025 13:46:03

मुंबई : (Sanjay Raut meets Raj Thackeray) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, ठाकरे बंधूंच्या युतीबाबत स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. (Sanjay Raut meets Raj Thackeray)

हेही वाचा :  PM Narendra Modi: जॉर्डन दौऱ्याचा दुसरा दिवस: पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात भारत–जॉर्डनची भूमिका समान असल्याचे केले स्पष्ट


या भेटीपूर्वीच संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या भेटीकडे माध्यमांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू होती. या भेटीनंतर त्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. (Sanjay Raut meets Raj Thackeray)
 
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती देत सांगितले की, मुंबईसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर तसेच पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहेत. सध्या जागावाटपावर अंतिम टप्प्यात चर्चा सुरू असून, युतीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Sanjay Raut meets Raj Thackeray)

हे वाचलात का ?: Central Railway : मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी सुखद 


पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “परिस्थिती कोणतीही असो, आता मुंबई वाचवण्यासाठी आम्हाला मैदानात उतरावेच लागेल.” (Sanjay Raut meets Raj Thackeray)

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या संभाव्य युतीमुळे मुंबईसह इतर महापालिकांमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांमध्ये ही युती निर्णायक ठरणार का?, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Sanjay Raut meets Raj Thackeray)
 

 
Powered By Sangraha 9.0