मुंबई : ( PF Withdrawal via UPI and ATM ) आता कर्मचारी UPI ने तात्काळ पीएफ चे पैसे काढू शकणार आहेत असा खुलासा थेट केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केलाय. मांडविया यांनी सांगितले की, पीएफ हा कर्मचार्यांच्या कष्टाने कमावलेला पैसा आहे, जो त्यांच्या पगारातून कापला जातो. आज पीएफ काढण्याची प्रक्रिया इतकी किचकट आहे की बरेच लोक फॉर्म भरून कंटाळतात. हीच अडचण लक्षात घेऊन सरकारने ७५ टक्यांपर्यंत पीएफ निधी कोणत्याही कारणाशिवाय काढता येत होती. तर पीएफ निधीची उर्वरित २५% रक्कम ही जामाच ठेवली जाते, कारण, जर एखादा कर्मचारी सात महिने काम केल्यानंतर काम सोडून देतो आणि संपूर्ण पीएफ शिल्लक काढतो आणि काही काळानंतर पुन्हा सामील होतो, तर त्यांची पीएफ सातत्यता खंडित होते.
हेही वाचा : ओबीसी बांधवांचा विषय पोट तिडकीने मांडणे आमचे काम - भाजप आमदार डॉ परिणय फुके
तथापि, पेन्शनसाठी १० वर्षे सतत सेवा आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, २५% ठेव ठेवल्याने कर्मचार्यांना नवीन नोकरी मिळेपर्यंत सुरक्षा मिळते, ज्यामुळे ते पेन्शनसाठी पात्र राहू शकतात. पण या प्रक्रियेत लोकांचा बराच वेळ वाया जातो, मात्र आता ही किचकट प्रक्रिया अजूनच सोपी होणार आहे. केंद्र सरकार आता UPI ने पीएफ चे पैसे काढण्याची तरतूद करणार आहे.
मार्च पूर्वी पीएफ यूपीआयशी जोडण्याच्या योजनेवर काम सुरू आहे, त्यानंतर कर्मचारी एटीएममधूनही त्यांचे पीएफ काढू शकतील. पीएफला डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडून, लोकांना कागदपत्रांच्या त्रासातून मुक्त करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारचे आहे. आता यूपीआय आणि एटीएमद्वारे पैसे काढण्याच्या सुविधेमुळे पीएफ काढणे सोपे व जलद होणार आहे.