मुंबई : (Mumbai BMC Election) महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या विविध भागांत झळकलेल्या पोस्टर्समुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पोस्टर्सवर कोणत्याही राजकीय पक्षाचे (Mumbai BMC Election) नाव अथवा चिन्ह नसले तरी, त्यातील मजकूर पाहता थेट उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर निशाणा साधण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. (Mumbai BMC Election)
हेही वाचा : Anil Parab Meets Raj Thackeray : "चर्चा सांगितल्या जात नाहीत, निर्णय..." राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
या पोस्टर्सवर “जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार?”, “मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको, मुंबईचा रंग बदलू देऊ नको”, तसेच “BMC IS NOT A FAMILY BUSINESS” असे आक्रमक संदेश लिहिण्यात आले आहेत. गेली तब्बल पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सत्ता असून, त्याच मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न या पोस्टर्समधून केला जात असल्याचे माध्यमांवरून म्हटले जात आहे. (Mumbai BMC Election)
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्ष मुंबईत आपली ताकद पणाला लावण्याच्या तयारीत आहेत. त्याआधीच शहरभर झळकलेले हे पोस्टर्स म्हणजे आगामी निवडणुकीतील राजकीय रणशिंग असल्याचे संकेत मिळत आहेत. या पोस्टर्सद्वारे मुंबईकरांना, विशेषतः मराठी माणसाला जागृत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे. (Mumbai BMC Election)
हे वाचलात का? : Sanjay Raut meets Raj Thackeray : पालिका निवडणुका जाहीर होताच संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, ठाकरे बंधूंच्या युतीवर चर्चेला वेग?
दरम्यान, हे पोस्टर्स नेमके कोणी लावले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, निवडणुकीपूर्वीच सुरू झालेल्या या पोस्टरवॉरमुळे मुंबईतील राजकीय तापमान चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे. (Mumbai BMC Election)