मुंबई : (Manikrao Kokate) सभागृहात रमी खेळल्याने चर्चेत आलेले आणि कृषिमंत्रीपद गमावलेले राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. आरोपी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना दोन वर्षांची सक्तमजुरी आणि दहा हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवार दि. १६ डिसेंबर रोजी सुनावली आहे.
हेही वाचा : Marathi Bhasha Kavyaratna Puraskar : प्रख्यात लेखिका डॉ. उमा कुलकर्णी यांना काव्यरत्न पुरस्कार जाहीर
माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे ३० वर्षांपूर्वीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अडचणीत आले आहेत. शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षे आणि १० हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Manikrao Kokate)
हे वाचलात का? : Bala Nandgaonkar : "हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकता..."; नेमकं काय म्हणाले बाळा नांदगावकर?
या प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयाने यापूर्वी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यावेळी त्यांना जामीन मिळाल्याने तात्काळ अटक टळली होती. मात्र आता जिल्हा सत्र न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवल्याने कोकाटेंच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (Manikrao Kokate)