Central Railway : मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी सुखद

16 Dec 2025 13:25:22
Central Railway
 
मुंबई : (Central Railway) मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेने (Central Railway) आपल्या संपूर्ण मार्गिकांवर प्रवासी स्नेही उपाययोजनांचा अवलंब केला आहे. यामध्ये स्थानकांवरील (Central Railway) सुविधांमध्ये सुधारणा करून प्रवाशांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षितता अधिक सक्षम केली आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांना आरामदायी, सुलभ आणि अखंड प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा आणि नवीन सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. (Central Railway)
 
यामध्ये प्रामुख्याने एकूण ६ नवीन एस्कलेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामध्ये पनवेल स्थानकावर ३, नेरळ स्थानकावर २ आणि बदलापूर स्थानकावर १ एस्कलेटरचा समावेश आहे. विविध स्थानकांवर एकूण १४८ नवीन ब्रशलेस डायरेक्ट करंट बीएलडीसी पंखे बसविण्यात आले आहेत. बीएलडीसी पंखे हे ब्रशलेस डीसी मोटरवर कार्य करणारे पंखे असून ते पारंपरिक इंडक्शन मोटर पंख्यांच्या तुलनेत अधिक ऊर्जा कार्यक्षम आणि कमी आवाज करणारे आहेत. या पंख्यांमध्ये कार्बन ब्रशऐवजी इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर व कायमस्वरूपी चुंबकांचा वापर करण्यात येतो, त्यामुळे ऊर्जेचा वापर सुमारे ५० ते ७० टक्क्यांनी लक्षणीयरीत्या कमी होतो. दादर स्थानकावरील उच्चस्तरीय तिकीट बुकिंग कॉन्कोर्समध्ये २ नवीन हाय व्हॉल्यूम लो स्पीड एचव्हीएलएस पंखे बसविण्यात आले आहेत. एचव्हीएलएस पंखे मोठ्या जागेत हळूहळू मोठ्या प्रमाणात हवा फिरवून प्रभावी थंडावा व हवेशीर वातावरण निर्माण करतात, तसेच कमी ऊर्जेच्या वापरात अधिक आराम व ऊर्जा बचत प्रदान करतात. (Central Railway)
 
हेही वाचा : Illegal Bangladeshi Fishermen : दादरला अवैध बांगलादेशी मच्छीमारांचा विळखा  
 
यासोबतच, विविध स्थानकांवर एकूण ३९१ नवीन एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. हे एलईडी दिवे ऊर्जा कार्यक्षम असून त्यांचा आयुष्यकाल जास्त आहे तसेच देखभाल व बदल खर्च कमी आहे. हे दिवे अधिक चांगला प्रकाश देतात आणि पर्यावरणपूरक आहेत. अंबरनाथ स्थानकावर जुने फलक हटवून एकूण १४ नवीन उपनगरीय रेल्वे (Central Railway) सूचना फलक बसविण्यात आले आहेत. हे नवीन फलक दिसायला आकर्षक असून त्यांची स्पष्टता अधिक चांगली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लोणावळा स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ वर एक नवीन वॉटर कूलर बसवण्यात आला आहे. (Central Railway)
 
Powered By Sangraha 9.0