मुंबई : (BMC Elections) भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Elections) २२७ पैकी १५० हून अधिक जागा जिंकण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी मंगळवारी दि. १६ डिसेंबर रोजी दिली. सुमारे चार वर्षांच्या विलंबानंतर होणाऱ्या या निवडणुकांनंतर मुंबईला मराठी महापौर मिळेल, असा दावाही त्यांनी केला. (BMC Elections)
पत्रकारांशी बोलताना शेलार म्हणाले की, महायुतीचा फॉर्म्युला आणि जागावाटप जवळपास अंतिम झाले असून, १६ डिसेंबर रोजी झालेल्या महायुती नेत्यांच्या बैठकीत निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पुढील काही दिवसांत या चर्चांना अंतिम स्वरूप दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (BMC Elections)
हेही वाचा : Sanjay Raut Vs Eknath Shinde : राऊतांची उपमुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती टीका, म्हणाले, “रहमान डकैत कोण आहेत हे...”
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शेलार यांनी, "काही लोकांनी आधीच पोस्टर्स लावून आपला पराभव मान्य केल्याची टीका केली आणि मुंबईकरांनी बदलाचा निर्णय घेतल्याचा दावा केला." तसेच मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे त्यांनी फेटाळून लावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत स्पष्ट भूमिका मांडल्याचेही शेलार म्हणाले. (BMC Elections)
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याशी कोणत्याही प्रकारची युती नाकारत शेलार म्हणाले की, महायुती नवाब मलिक यांच्यासोबत निवडणूक लढवणार नाही. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे (BMC Elections) निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर होणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (BMC Elections)