मुंबई : (Bala Nandgaonkar) मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट यांच्यातील संभाव्य युतीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी या विषयावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडताना त्यांनी विशेषतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम मत व्यक्त केले.
सध्या मुंबईत “जे हिंदुत्वाचे झाले नाहीत ते मराठी माणसाचे कसे होणार?” असे बॅनर चर्चेचा विषय ठरत असताना, बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) म्हणाले की "ठाकरे कुटुंबाला हिंदुत्व काय आहे हे शिकवण्याची कोणालाही गरज नाही. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी मोठा संघर्ष केला आहे. हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे त्यांना सहा वर्षांचे निलंबन सहन करावे लागले होते आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकता येते, हे संपूर्ण देशाला त्यांनी दाखवून दिले."
हेही वाचा : PM Narendra Modi: जॉर्डन दौऱ्याचा दुसरा दिवस: पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात भारत–जॉर्डनची भूमिका समान असल्याचे केले स्पष्ट
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील जागावाटपाचा मुद्दाही उपस्थित केला. "मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी १३५ जागांवर शिंदे गटाच्या शिवसेनेने दावा केल्याचा उल्लेख करत, शिवसेना (उद्धव गट) आणि मनसे यांच्यात निवडणुकीसाठी गणित जुळले आहे का, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र, गणित सुटणार आहे," असे त्यांनी (Bala Nandgaonkar) म्हटले आहे.
पुढे ते (Bala Nandgaonkar) म्हणाले की, राज ठाकरे हेच मनसेचे सर्वेसर्वा आहेत. पक्षाचे सर्व निर्णय तेच सर्वांना सोबत घेऊन घेतात आणि अंतिम निर्णय त्यांचाच असेल.