मुंबई : (Anil Parab Meets Raj Thackeray) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब (Anil Parab Meets Raj Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युतीबाबत महत्त्वाचे संकेत देत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “चर्चा कधी सांगितल्या जात नाहीत, तर अंतिम निर्णय झाल्यानंतरच ते जाहीर केले जातात.” त्यामुळे, त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. (Anil Parab Meets Raj Thackeray)
अनिल परब म्हणाले की, "युतीची तारीख लवकरच कळेल. अंतिम निर्णय झाल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करतील. सध्या चर्चा सुरू असून, त्यातून कोणते निर्णय घ्यायचे हे संबंधित पक्षनेते ठरवतील. ज्या दिवशी निर्णय होतील, त्याच दिवशी ते जाहीर केले जातील," असेही त्यांनी स्पष्ट केले. (Anil Parab Meets Raj Thackeray)
हेही वाचा : Sanjay Raut meets Raj Thackeray : पालिका निवडणुका जाहीर होताच संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, ठाकरे बंधूंच्या युतीवर चर्चेला वेग?
महाविकास आघाडीबाबत बोलताना परब म्हणाले की, "मविआने एकत्र निवडणुका लढवाव्यात, ही आमची इच्छा आहे आणि मविआ एकत्र राहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुंबईत उबाठा आणि मनसे यांच्यात युती होण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे संकेतही त्यांनी दिले. मात्र, काँग्रेसच्या हाय कमांडसोबत चर्चा करायची की नाही, याचा निर्णय माझा नसून तो पक्षनेतृत्व घेईल," असेही ते म्हणाले. (Anil Parab Meets Raj Thackeray)
पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, "मुंबईच्या जनतेचे आजही उबाठावर प्रेम आहे आणि त्यांचा विश्वास कायम आहे. आमची लढाई त्या त्या वॉर्डात आमच्या समोर जो उभा राहील, त्याच्याशी असेल,” असे सांगत त्यांनी आगामी महापालिका निवडणुकींसाठी आत्मविश्वास व्यक्त केला. (Anil Parab Meets Raj Thackeray)
दरम्यान, या भेटीनंतर अनिल परब यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबतची उत्सुकता आणखी वाढली असून, राज्याच्या राजकारणात पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. (Anil Parab Meets Raj Thackeray)