मुंबई : (Vishva Hindu Parishad) विश्व हिंदू परिषदेच्या (Vishva Hindu Parishad) विश्व विभागाचे माजी महामंत्री व उपाध्यक्ष तसेच हिंदू–बौद्ध समन्वयात निष्णात असलेले मोहनधर दिवाण यांचे नुकतेच निधन झाले. मोहनधर दिवाण हे असे एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते की, कितीही कठीण काम असले तरी ते सहजतेने पूर्ण करत आणि प्रत्येकाला आपला मित्र बनवत. ते हिंदू समाज आणि संघटनात्मक कार्यातही अत्यंत कुशल होते. दक्षिण दिल्लीतील विश्व हिंदू परिषद (Vishva Hindu Parishad) मुख्यालयात मोहनधर दिवाण यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.(Vishva Hindu Parishad)
याप्रसंगी विहिपचे संरक्षक दिनेशचंद्र, केंद्रीय महामंत्री बजरंग लाल बागडा, केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे, सह संघटन महामंत्री विनायक राव देशपांडे, संयुक्त महामंत्री स्वामी विज्ञानानंद, कोटेश्वर शर्मा, केंद्रीय मंत्री राजेंद्र सिंह पंकज, सुधांशु पटनायक, अशोक तिवारी तसेच राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांच्यासह दिवाण यांचे पुत्र, कन्या, पत्नी व अन्य कुटुंबीय उपस्थित होते.(Vishva Hindu Parishad)
हेही वाचा : Exotic Bird Park : मुलुंड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘विदेशी पक्षी उद्यानाचे’ भूमिपूजन
मूळचे छत्तीसगडच्या चांपा येथील रहिवासी असलेल्या दिवाण यांनी गेल्या मंगळवारी दक्षिण दिल्लीतील नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये वयाच्या ९१व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्रद्धांजली सभेदरम्यान वक्त्यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले की, मोहनधर दिवाण यांनी राम मंदिर आंदोलनाच्या न्यायालयीन प्रक्रियेला बळ देण्यासाठी लोधी रोडवरील एका फ्रेंच लायब्ररीतून सन १७८६ मध्ये फ्रेंच भाषेत प्रकाशित झालेल्या ६०० पानांच्या ‘हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ इंडिया’ या पुस्तकाचा शोध लावला होता. हे दुर्मिळ पुस्तक भारतात शोधून काढणे आणि न्यायालयास सादर करणे ही त्या काळातील मोठीच आव्हानात्मक गोष्ट होती. पुढे याच पुस्तकातील पुरावे राम जन्मभूमी मुक्तीसंदर्भात २०१० मधील उच्च न्यायालयाच्या आणि २०१९ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भाग ठरले.(Vishva Hindu Parishad)