ठाणे : (Inauguration Of The BJP Public Relations Office) ठाणे शहरामध्ये प्रभाग क्रमांक ३ मानपाडा, मनोरमानगर आझाद नगर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दत्ता घाडगे यांनी मानपाडा येथे त्यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन (Inauguration Of The BJP Public Relations Office) ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या हस्ते करण्यात आले.(Inauguration Of The BJP Public Relations Office)
हेही वाचा : Sanjay Kelkar : सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास : आमदार संजय केळकर
प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक उपक्रम राबवले जातात. हे सर्व उपक्रम लोकांपर्यंत घरोघरी पोहोचवण्याच्या उद्देशाने व जनसंपर्क वाढवण्याच्या उद्देशाने नवीन कार्यालय उघडण्यात आले असल्याचे दत्ता घाडगे यांनी सांगितले. या उद्घाटन (Inauguration Of The BJP Public Relations Office) प्रसंगी गटनेता मनोहर डोंगरे, जिल्हा सरचिटणीस विक्रम भोईर, महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नाली साळवी, मंडल अध्यक्ष जितेंद्र मढवी, सूरज दळवी, चंद्रमा चव्हाण, संतोष घंटे, महेश चव्हाण,वैशाली चव्हाण व इतर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.(Inauguration Of The BJP Public Relations Office)