मुंबई : (Bajrang Dal) गीता जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी बजरंग दलाचे शौर्य संचलन आयोजित करण्यात येते. शौर्य संचलनात बजरंग दलाचे (Bajrang Dal) कार्यकर्ते गणवेशात घोषाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन करतात. यावर्षी ठाणे विभागाचे एकत्रित शौर्य संचलन रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी ऐरोली येथे आयोजित करण्यात आले होते. दुपारी ४ वाजता विठ्ठल सुतार मैदान, सेक्टर २० ऐरोली येथून हे संचलन सुरू झाले. गावदेवी मैदान, ऐरोली येथे संचलनाचा समारोप झाला. या शौर्य संचलनात एकूण ७९१ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. संचलन समारोपाच्या नंतर गावदेवी मैदान, ऐरोली येथे संतांचे आशीर्वचन व प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन होऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.(Bajrang Dal)
पूजनीय स्वामी शिवरूपानंद जी महाराज यांनी आपल्या आशिर्वचनात सांगितले की, " विश्व हिंदू परिषद, बजरंग दल (Bajrang Dal) समाजात वेळोवेळी धर्मरक्षणासाठी जनजागृतीचे कार्य करत आहे. बजरंग दलाने (Bajrang Dal) हाती घेतलेले व्यसनमुक्त युवा, सशक्त भारत हे अभियान देखील प्रशंसनीय आहे. व्यसनमुक्ती अभियानामुळे लाखो तरुणांच्या जीवनाला आकार मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यातील पडघा, बोरिवली सारख्या गावात नुकत्याच राष्ट्रीय तपासयंत्रणांच्या धाडीत दहशतवाद्याचे मोठे नेटवर्क उघडकीस आले. येत्या काळात हिंदू तरुणांनी अधिकाधिक जागृत राहून जिहादी दहशतवाद्यांचे नेटवर्क नेस्तनाबूत करण्यासाठी बजरंग दलाच्या (Bajrang Dal) माध्यमातून कार्यरत व्हावे.
विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर यावेळी म्हणाले की, "देशात वाढत असलेला इस्लामी आतंकवाद हा अंतर्गत सुरक्षेचा खूप मोठा मुद्दा आहे. लॅण्ड जिहादच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख भागांचे डेमोग्राफी बदलण्याचे मनसुबे सुद्धा आखले जात आहेत. हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात बुद्धिभेद करण्याचे काम सुद्धा काही वामपंथी घटकांकडून करण्याचे काम सुरू आहे. येत्या काळात अधिकाधिक हिंदू तरुणांनी बजरंग दलात (Bajrang Dal) सामील होत देव, देश, धर्म रक्षणाच्या प्रकियेत सहभागी व्हावे. बजरंग दल (Bajrang Dal) कोकण प्रांत संयोजक रंजीत जाधव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना स्वदेशी वस्तू वापराबाबतची प्रतिज्ञा दिली. तसेच समारोप सभेच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बजरंग दल (Bajrang Dal) नवी मुंबई जिल्हा संयोजक शंकर संगपाळ, प्रास्तविक ठाणे विभाग संयोजक अमरजीत सुर्वे, आभार प्रदर्शन नवी मुंबई जिल्हा मंत्री स्वरुप पाटील यांनी केले.(Bajrang Dal)
हेही वाचा : Dr. Ramvilas Das Vedanti : श्रीराम मंदिर आंदोलनातील अग्रगण्य व्यक्तिमत्व डॉ. रामविलास दास वेदांती यांचे निधन
या कार्यक्रमात कबीर मठ ठाणे महंत महावीर दास महाराज, ह.भ.प भजनरत्न महादेव बुवा शहाबाजकर, ह.भ.प लक्ष्मण महाराज पांचाळ, ह.भ.प सुनील महाराज रानकर, ह.भ.प पंडित महाराज वर्पे, विश्व हिंदू परिषद ठाणे विभाग मंत्री मनोज शर्मा, सहमंत्री आशुतोष तिवारी, विश्व हिंदू परिषद नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक भन्साली, उपाध्यक्ष डॉ. अतुल नाईक, जिल्हा सहमंत्री श्याम मोहनन, मातृशक्ती प्रमुख नयना शेट्टी, दुर्गा वाहिनी सहसंयोजक अंकिता चाळके, कळवा मुंब्रा जिल्हा मंत्री रवींद्र पाटील, बजरंग दल संयोजक गिरीश पाटील, अनुप पांडे, विजय पांडे, बजरंग दल सहसंयोजक अरुण पाटील, तेजस पाटील, संदीप पाल, योगेश सिलवेरू, संजीव रावत उपस्थित होते.(Bajrang Dal)
बजरंग दलाच्या (Bajrang Dal) माध्यमातून धर्म रक्षा, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, जबरी धर्मांतरणास विरोध अशा समाजातील विविध समस्यांवर जनजागृती अभियान आयोजित केले जाते. नुकताच बजरंग दल नवी मुंबईच्या वतीने ‘नशामुक्त युवा, विकसित भारत अभियान’ पार पडले. यामध्ये बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी नशामुक्ती साठी लोकवस्ती, शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्टेशन अशा प्रमुख ठिकाणी जनजागृती अभियान केले.(Bajrang Dal)