पुणे : (CM Devendra Fadnavis) येथील पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत लढणार आहे. यामुळे आम्ही तिसऱ्याला फायदा होऊ देणार नाही. महायुती मध्ये कोणतीही कटुता नाही. आम्ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार असलो तरी महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाणार आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. पुणे शहरातील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री (CM Devendra Fadnavis) पुढे म्हणाले की,' याद्यांमध्ये घोळ आहेत. परंतु त्यासाठी निवडणूक न घेणे हे योग्य नाही. राज्यात महायुतीत विविध समीकरणे दिसणार आहेत. महाराष्ट्रात भाजपा मध्ये येण्याची ओढ आहे. पक्ष प्रवेशाबत प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक अध्यक्ष निर्णय घेतील. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार आहे. पृथ्वीराज बाबांनी योग्य विचार करायला पाहिजे. काँग्रेसकडे मैदान सोडून जाणारा नेता आहे. अशा नेत्या मुळे कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. शिवसेना भाजपा सोबत असणार आहे. जनतेचा आशीर्वाद मोदीजी यांच्या सोबत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला काळजी करण्याचे कारण नाही.(CM Devendra Fadnavis)
हेही वाचा : Tejasvi Ghosalkar : उबाठा गटाला धक्का; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबई मध्ये आमचाच विजय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'मुंबई महापालिकेत कोणीही एकत्र आले तरी आम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. मुंबईमधील जनता भाजपा आणि शिवसेनेला भरघोस मतदान करणार आहे. त्यांनी मराठी अस्मितेसाठी आम्ही केलेले काम बघितले आहे.' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. पुणे शहरातील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते.(CM Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) पुढे म्हणाले की,' याद्यांमध्ये घोळ आहेत. परंतु त्यासाठी निवडणूक न घेणे हे योग्य नाही. राज्यात महायुतीत विविध समीकरणे दिसणार आहेत. महाराष्ट्रात भाजपा मध्ये येण्याची ओढ आहे. पक्ष प्रवेशाबत प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक अध्यक्ष निर्णय घेतील. मुंबईमध्ये महायुती चालणार आहे. मुंबईकरांनी बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आमचा विजय होणार आहे.(CM Devendra Fadnavis)