मुंबई : (Maharashtra Municipal Elections) गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या राज्यातील एकूण २९ महापालिकांच्या निवडणुका (Maharashtra Municipal Elections) अखेर जाहीर झाल्या आहेत. सोमवार दि. १५ डिसेंबर रोजी झालेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकींचे मतदान १५ जानेवारीला होणार असून निकाल १६ जानेवारीला लागणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत राज्यातील २९ महापालिकांसाठी ३ कोटी ४८ लाख मतदार मतदान करणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. (Maharashtra Municipal Elections)
हेही वाचा : BMC Elections: राज्यातील महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं! १५ जानेवारीला महापालिका निवडणुका होणार: आयुक्त दिनेश टी. वाघमारे
दरम्यान, राज्यातील २७ महापालिकांची (Maharashtra Municipal Elections) मुदत संपून बराच काळ झाला आहे. त्यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिका असून, त्यांच्याही निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ ची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं आहे. (Maharashtra Municipal Elections)
त्यासोबतच, महापालिका निवडणुकीसाठी (Maharashtra Municipal Elections) खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिली आहे. त्यामध्ये मुंबईसह अ वर्ग महापालिकांसाठी एका उमेदवाराला १५ लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे. तर ब वर्गासाठी १३ लाख, क वर्ग ११ लाख आणि ड वर्ग ९ लाख अशी खर्च मर्यादा आखण्यात आली आहे. (Maharashtra Municipal Elections)
हे वाचलात का ?: Bondi Beach shooting : बाँडी बीचवर गोळीबार सुरु असताना फळविक्रेत्याने थेट शूटरलाच घेरलं; वाचवले अनेकांचे प्राण!
महापालिका निवडणुकींसाठी (Maharashtra Municipal Elections) महत्त्वाच्या तारखा कोणत्या?
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात - २३ डिसेंबर २०२५
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत - ३० डिसेंबर २०२५
अर्जांची छाननी - ३१ डिसेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची मुदत - २ जानेवारी २०२६
निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी - ३ जानेवारी २०२६
मतदान - १५ जानेवारी २०२६
मतमोजणी - १६ जानेवारी २०२६
कोणत्या महापालिकांमध्ये निवडणूक (Maharashtra Municipal Elections) होणार?
१. बृहन्मुंबई
२. भिवंडी-निजामपूर
३. नागपूर
४. पुणे
५. ठाणे
६. अहमदनगर
७. नाशिक
८. पिंपरी-चिंचवड
९. औरंगाबाद
१०. वसई-विरार
११. कल्याण-डोंबिवली
१२. नवी मुंबई
१३. अकोला
१४. अमरावती
१५. लातूर
१६. नांदेड-वाघाळा
१७. मीरा-भाईंदर
१८. उल्हासनगर
१९. चंद्रपूर
२०. धुळे
२१. जळगाव
२२. मालेगाव
२३. कोल्हापूर
२४. सांगली-मिरज-कुपवाड
२५. सोलापूर
२६. इचलकरंजी
२७. जालना
२८. पनवेल
२९. परभणी